11 May 2025 12:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | IT शेअर मालामाल करणार; रॉकेट तेजीत होईल कमाई, स्वस्तात खरेदी करा - NSE: DATAPATTNS Data Patterns Share Price | रॉकेट तेजीत आहे हा शेअर, 4.35 टक्क्यांनी वाढला, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: DATAPATTNS BPCL Share Price | होय! तब्बल 44 टक्के परतावा देईल हा सरकारी कंपनीचा शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BPCL National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला महिना रु.7500, रु.6429, रु.5357 की रु.4286 पेन्शन मिळणार? अपडेट आली Horoscope Today | 11 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

राज्यात ७९० नवे कोरोना रुग्ण, ३६ मृत्यू, एकूण रुग्ण १२,२०० च्याही पुढे

Corona Crisis, Covid 19, Maharashtra

मुंबई, २ मे: महाराष्ट्रात ७९० नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर मागील चोवीस तासात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ५२१ रुग्णांचा मृत्यू कोरोनाची लागण झाल्याने झाला आहे. आज महाराष्ट्रात १२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रातील २ हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

धारावीमध्ये एकूण १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये काही डॉक्टरांचाही समावेश आहे. यामुळे मुंबई महापालिकेसह राज्य सरकारचीही भंबेरी उडाली होती. आज ३८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून धारावीमध्ये सापडलेल्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४९६ झाली आहे. यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर महत्वाचे म्हणजे गेल्या दोन दिवसांत धारावीतील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

दुसरीकडे, सिंधुदुर्गातील मुंबईत स्थायिक झालेली अनेक कुटुंबे एप्रिल, मे महिन्यात म्हणजेच आंब्या फणसाच्या दिवसांत आपल्या मूळगावी येतात पण यावर्षी मात्र त्यांची गावाकडची वाट सोपी राहिलेली नाही. करोनामुळे ही वाट बिकट झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे ताजे आदेश लक्षात घेता मुंबईतून येथे येणाऱ्यांना स्वत:च्या घरात पाऊल ठेवायला किमान १४ दिवस वाट पाहावी लागणार आहे.

 

News English Summary: In Maharashtra, 790 new corona patients have been found positive, bringing the number of corona patients in the state to 12,296. In the last 24 hours, 36 patients have died. So far, 521 patients have died due to corona infection in Maharashtra.

News English Title: Story 790 New Covid19 Positive Cases 36 Deaths Reported In Maharashtra state Today Taking The Total Number Of Cases To 12296 And Death Toll To 521 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या