30 April 2025 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

केंद्र सरकारच्या गाइडलाइनमध्ये धरसोडवृत्ती, त्यामुळेच कोरोना अधिक वाढला - अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe, Corona Crisis

मुंबई, १६ मे: देशातील करोना रुग्णांचा आकडा ८१ हजारहून अधिक झाला असून शुक्रवारी तो ८१,९७० इतका होता. गेल्या चोवीस तासांमध्ये ३,९६७ नव्या रुग्णांची भर पडली असून १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू २,६४९ झाले आहेत. जगभरात मृत्यूचे प्रमाण ६.९२ टक्के इतके असले तरी भारतात ते सध्या ३.२३ टक्के आहे. एकूण २७,९२० रुग्ण बरे झाले आहेत.

मागील चोवीस तासांमध्ये १,६८५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३४.०६ टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. करोनासंदर्भातील १५ व्या मंत्रिगटाची बैठक शुक्रवारी झाली. ही बैठक केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाळेबंदीमुळे करोनाच्या रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले आहे. टाळेबंदी लागू करण्यापूर्वी हे प्रमाण ३.४ दिवस होते पण, आता ते १२.९ दिवसांवर पोहोचले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. खासदार अमोल कोल्हे म्हणतात, पहिला लॉकडाऊन झाला, त्यावेळी आपल्याकडे ५०० ते ५५० एवढेच रुग्ण होते. पहिला लॉकडाऊन जेव्हा संपला तेव्हा आपण १० हजारांचा टप्पा ओलांडला होता. दुसरा लॉकडाऊन संपला तेव्हा आपण जवळपास २५ ते ३० हजारांचा टप्पा ओलांडला होता. आजच आपण ७५ हजारांच्या घरात आहोत आणि १७ तारखेपर्यंत कदाचित आपण ८० हजारांचा टप्पा ओलांडू, असा अंदाज वाटतोय.

जर कम्युनिटी स्प्रेड थांबवण्यासाठी हा लॉकडाऊन होता, तर आपल्याला किती यश मिळालं हा आत्मपरीक्षणाचा भाग आहे. पायाभूत सुविधा तयार करण्यात महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. केंद्र सरकारच्या गाइडलाइनमध्ये एक धरसोडवृत्ती पाहायला मिळतेय. मागच्या लॉकडाऊनमध्ये दोन-अडीच दिवसांनंतर एक नवीन सूचना येत होती. दर दोन दिवसांनी जेव्हा सूचना बदलायला सुरुवात होते, तेव्हा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेमध्ये गोंधळ उडतो, असं म्हणत कोल्हेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

News English Summary: NCP MP Amol Kolhe has strongly criticized the Center. MP Amol Kolhe says the central government’s guidelines show a resilience. A new notification was coming in two-and-a-half days after the previous lockdown. Every couple of days when the instructions start to change.

News English Title: NCP MP Amol Kolhe criticized Modi government over corona crisis in India News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या