3 May 2025 11:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN
x

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या पार, २ आठवड्यात रुग्णसंख्येत दुप्पटीने वाढ

Indian Corona Virus, Covid 19 cases

नवी दिल्ली, १९ मे: देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. आता देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी लॉकडाउन लागू आहे. लॉकडाउनमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग थांबत नाहीये. परिस्थिती अशी आहे की १२ दिवसातच कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णाने लाखाची संख्या ओलांडली आहे. आरोग्य मंत्र्यालयाने सकाळी दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाख एक हजार १३९ झाली आहे. मागील २४ तासांत ४९७० नवीन करोनाग्रस्त आढळले तर १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसातील कोरोनाग्रस्त विदेशातून आलेले किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरातून गाव-खेड्यात पोहलले रूग्ण आहेत. स्थलांतरामुळे शहरातील कोरोना गाव खेड्यात पोहचल्याचे चित्र आहे.

भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पहिला लॉकडाउन २५ मार्चपासून सुरू झाला. त्यानंतर देशात कोरोना विषाणूचे ६०६ रुग्ण संक्रमित झाले. पहिला लॉकडाउन १४ एप्रिल रोजी संपला. त्याच वेळी, जेव्हा १५ एप्रिल रोजी देशात दुसरे लॉकडाउन सुरू झाले तेव्हा देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ११४३९ होती.

दुसरे लॉकडाउन देशात ३ मे पर्यंत चालले. पण कोरोना विषाणूचा संसर्ग थांबला नाही. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा ४ मेपासून देशात सुरू झाला. यावेळी, भारतात कोरोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ४२५३३ होती. तिसरा लॉकडाउन दोन आठवड्यांपर्यंत चालला आणि १७ मे रोजी तो संपला.

१८ मेपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात चित्र वेगळे लॉकडाऊन ४ च्या पहिल्या दिवसापर्यंत देशात कोरोना विषाणूचे ९६१६९ पॉझिटिव्ह रूग्ण होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या पहिल्या दिवसानंतर, देशात एक लाखाहून अधिक जणांना कोरोनाची लागण झालेली दिसते आहे.

दुसरीकडे राज्यात सोमवारी करोनाचे आणखी २,०३३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या ३५,०५८ वर पोहोचली. राज्यात सोमवारी ५१ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या १,२४९ वर पोहोचली. राज्यभरात आतापर्यंत ८,४३७ रुग्ण बरे झाले आहेत.

 

News English Summary: The number of coroners in the country is increasing day by day. The number of coronary heart disease patients in the country has crossed one lakh. As per the information given by the Ministry of Health this morning, the number of coronary heart disease in the country has reached one lakh one thousand 139.

News English Title: Covid 19 Cases Cross 1 Lakh Mark With A Single Day Jump Of 4970 Cases in India News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या