लॉकडाउन: महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा २४ टन तांदूळ पकडला

अहमदनगर, २९ मे: कोरोना संकटात लढण्यासाठी उद्भवलेल्या परिस्थितीमुळे देशभर लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांना अन्नधान्य पुरवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोफत अन्न धान्य दिलं जातंय. मात्र रेशनवर या अन्नधान्याचा काळाबाजार होताना दिसतोय. असाच एक काळाबाजार करण्यासाठी निघालेला एक ट्रक पोलिसांनी जामखेड तालुक्यात पकडला. या ट्रकमध्ये तब्बल २४ टन तांदूळ सापडला आहे. हा ट्रक गुजरातला जात होता.
जामखेड तालुक्यातील चौंडी येथे सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. तालुक्यातील सोनगाव येथील मंदा सुग्रीव वायकर यांच्या नावे असलेल्या रेशन दुकानातील हा तांदूळ आहे. ट्रकचालक शशिकांत भीमराव गवळी (रा. कुर्डूवाडी ता. माढा) व सहचालक संदीप सुनील लोंढे (रा. बारलोणी ता. माढा जिल्हा सोलापूर) या दोघांना पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून २४ टन तांदळासह ट्रक जप्त केला आहे.
वायकर यांच्या दुकानातील हा तांदूळ असल्याचे ट्रकचालकांनी सांगितल्यावर पोलिस व अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन तपासणी केली. दुकानातील धान्यांच्या नोदींतही तफावत आढळून आली आहे. त्यामुळे दुकानदाराविरुद्धही कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
News English Summary: Free food grains are provided by the Central and State Governments to provide food grains to the poor during the lockdown. However, it is seen that this food grain is being black marketed on rations. One such truck was caught by the police in Jamkhed taluka. About 24 tonnes of rice was found in the truck. This truck was going to Gujarat.
News English Title: Two arrested at Ahmednagar for supplying PDS rice in black market to Gujarat state News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN