तर आंदोलनकर्त्यांना दहशतवादी घोषित करणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन, १ जून: कोरोना संकटाशी झगडत असताना अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर देशातील अनेक भागात हिंसाचार भडकला आहे. अमेरिकेच्या मिनियापोलिस व्यतिरिक्त फ्लोरिडा, जॅक्सनविले, लॉस एंजेलिस, पिट्सबर्ग, न्यूयॉर्कसह अनेक ठिकाणी लोक आंदोलन करत आहेत. मिनियापोलिसमध्ये पोलिसांच्या अमानुष मारहाणीत जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू झाला. फ्लॉइडच्या मृत्यूनंतर हिंसाचार उफाळून आला आहे. अमेरिकेच्या ५ मोठ्या शहरांमध्ये हिंसाचार सुरू आहे.
मिनिआपोलिस शहरात सोमवारी ४६ वर्षीय जॉर्ज फ्लॉइड यांच्या गळ्यावर गुडघा ठेऊन बसलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये जॉर्ज आपल्याला श्वास घेता येत नसल्याचं या पोलिसांना सांगतानाही दिसत आहेत. या प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. तर डेरेक शॉविन या ४४ वर्षीय श्वतेवर्णीय अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शॉविन यांना सोमवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे.
दरम्यान, जॉर्ज फ्लॉएडची पोलिसांनी हत्या केली असल्याचा आरोप करत अमेरिकेत वर्णद्वेषविरोधी आंदोलन तीव्र झाले आहे. या आंदोलनाची धग व्हाइट हाउसपर्यंत पोहचली आहे. या आंदोलनात सहभागी असणाऱ्या ‘एण्टीफा’ (Antifa) गटाला दहशतवादी संघटना घोषित करणार असल्याचा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. या आंदोलनामागे डाव्या विचारांच्या संघटना असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच केला आहे.
वर्णद्वेषी आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. अमेरिकेतील जवळपास ४० शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. व्हाइट हाउससमोर आंदोलन करणाऱ्या एका गटाने जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला होता. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना बंकरमध्ये नेण्याची वेळ सुरक्षा रक्षकांवर आली. आता या आंदोलनामागे असणाऱ्या गटांना दहशतवादी संघटना घोषित करणार असल्याचा इशारा ट्रम्प यांनी ट्विटद्वारे दिला आहे.
The United States of America will be designating ANTIFA as a Terrorist Organization.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) May 31, 2020
News English Summary: The anti-apartheid movement has intensified in the United States, accusing George Floyd of being murdered by police. The cloud of this movement has reached the White House. President Donald Trump has warned that the Antifa group will be declared a terrorist organization.
News English Title: George Floyd death US President Donald Trump wants to declare protester Antifa group as terrorist organisation News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN