30 April 2025 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य करणं हेच ध्येय

CM Uddhav Thackeray,

मुंबई, ५ जून: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या कित्येक वर्षांपासून सक्रिय असणाऱ्या आणि या राज्याचं मुख्यमंत्रीपद भुषवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. शिवसेना या पक्षासोबतत आव्हानाच्या प्रसंगात राज्याची धुराही तितक्चाय संयमानं आणि जबाबदारीनं सांभाळणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जनतेची साथ आणि अर्थातच जनतेचं प्रेमही मिळालं.

आएएनएस आणि सीव्होटर्स या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालात उद्धव ठाकरे हे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं. आपल्या वाट्याला आलेलं जनतेचं हे प्रेम पाहता त्यांनी सर्वांचेच सहृदय आभार मानले आहेत. एका जाहीर पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राला जगभरात अव्वल स्थानी आणण्याचा मानसही व्यक्त केला आहे.

देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस आणि सी व्होटर्स या संस्थेने संयुक्तरित्या सर्व्हेक्षण केलं. या सर्व्हेक्षणातील आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ७६.५२ टक्के आहे. यासोबत उद्धव ठाकरे यांचा समावेश देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये झाला आहे.

महाराष्ट्राच्या जनतेने संकट काळात विश्वास दाखवला. माझे मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व अधिकारी या सर्वांचे आभार. अर्थात तमाम शिवसैनिकांचे प्रेम व शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेबांचा आशीर्वाद याशिवाय ही झेप शक्य नाही अशी भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

 

News English Summary: Seeing this love of the people, he has thanked them all. Through a public statement, he has also expressed his intention to bring Maharashtra to the top position in the world.

News English Title: CM Uddhav Thackeray expressed his intention to bring Maharashtra to the top position in the world News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या