1 November 2024 5:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 3 शेअर्स खरेदी करा, स्टॉक खरेदीला गर्दी, रोज 20% अप्पर सर्किट हिट PPF Investment | PPF मधील महिना बचत मॅच्युरिटीला देईल 41 लाख रुपये परतावा, असा मिळाला मोठा फायदा - Marathi News Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा शेअर तेजीने परतावा देणार, स्टॉक खरेदीला गर्दी, मजबूत कमाई होणार - NSE: PATELENG
x

जुलैच्या मध्यावर किंवा ऑगस्टमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव शिखरावर असेल - डॉ. एस. पी. ब्योत्रा

Corona virus, Peck Point, Dr S P Byotra

नवी दिल्ली, १२ जून : कोरोनाचा संसर्ग आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वेगाने वाढतो आहे. दररोज नवीन रुग्णांची संख्या नवे उच्चांक गाठते आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात परिस्थिती सर्वात भीषण आहे, कारण महाराष्ट्रात रुग्णसंख्या आत्ताच लाखाच्या घरात पोहोचली आहे आणि दिल्लीही त्याच मार्गावर आहे. पण इतर देशात झालं त्याप्रमाणे हाच आपल्या देशातल्या साथीचा उच्चांक किंवा peak आहे का? तर तज्ज्ञांनी याचं उत्तर नाही असं दिलं आहे. म्हणजे याहूनही मोठ्या संख्येने रुग्णवाढ व्हायची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. हा धोक्याचा इशारा सर गंगा राम रुग्णालयाचे उपाध्यक्ष डॉ. एस. पी. ब्योत्रा यांनी दिला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर थांबणार नाही. जुलैच्या सुरुवातीला किंवा मध्यावर अथवा ऑगस्टमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव शिखरावर असेल, असा अंदाज ब्योत्रा यांनी वर्तवला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळ्यांचं लक्ष लसीकडे लागलं आहे. मात्र कोरोनावरील लस पुढील वर्षाच्या तिमाहीपर्यंत तरी येणार नाही, अशी शक्यता ब्योत्रा यांनी वर्तवली. याआधी दिल्ली सरकारनंदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

एवढ्यात COVID-19 वरची लस (COVID-19 Vaccine) यायची शक्यताही दिसत नसल्याचं दिल्लीतले त्जज्ञ डॉक्टर ब्योत्रा म्हणाले. “कोरोनावरची लस उपलब्ध व्हायला पुढच्या वर्षातले पहिले काही महिने तरी लागतील. भारतात या साथीने आता हातपाय पसरले आहेत. पण अद्याप विस्फोट झालेला नाही. जुलैच्या मध्यावर किंवा शेवटी अथवा ऑगस्टमध्ये कोरोना व्हायरस साथीचा उद्रेक भारतात व्हायची शक्यता आहे”, असे डॉक्टर ब्योत्रा म्हणाले.

मागील महिन्यात दिल्ली सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या संकटाबद्दलची आकडेवारी ठेवण्यात आली. १५ जूनपर्यंत दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या ४४ हजारांपर्यंत जाईल. सध्या हा आकडा ३५ हजारांच्या जवळपास आहे. ३० जूनपर्यंत दिल्लीतील कोरोना बाधितांची संख्या १ लाख, १५ जुलैपर्यंत २.२५ लाख आणि ३१ जुलैपर्यंत ५.३२ लाखांच्या घरात जाईल, असा अंदाज आहे.

 

News English Summary: The outbreak of corona will not stop soon. Corona outbreaks are expected to peak in early July or mid-August, Biotra said. Everyone is focused on vaccines to prevent the spread of coronavirus. However, the coronavirus vaccine will not be available until next year’s quarter, Biotra said.

News English Title: Corona virus cases may reach their Peak July or August India says Dr S P Byotra News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x