3 May 2025 9:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू

BMC assistant commissioner Ashok Hhairnar, Corona Virus, Covid 19

मुंबई, ११ जुलै : मुंबईत कोरोनाबाबत सर्वात चांगली कामगिरी असणाऱ्या वांद्रे पूर्व-खार येथील एच ईस्ट वॉर्डच्या ऑफिसरचा मृत्यू झाला आहे. एच ईस्ट वॉर्डचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार ( वय 57 वर्ष) यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी अशोक खैरनार यांची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. सुरुवातीला त्यांच्यावर वांद्रे येथील गुरुनानक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यानंतर सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.

शिवाजी पार्क स्मशानभूमीत अशोक खैरनार यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सुरूवातीला रूग्णसंख्या वाढलेल्या वांद्रे पूर्व येथील एच पूर्व विभागात अशोक खैरनार यांनी प्रयत्न केले. खैरनार यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईत सर्वात कमी ग्रोथ रेट त्यांच्या एच इस्ट वॉर्डचा होता. रुग्णसंख्या वाढीचा दर रोखण्यात तसंच, डबलींग रेट वाढवण्यात त्यांना यश आलं होतं. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीचा परिसर एच पूर्व विभागात येतो.

यापूर्वी पालिकेचे उपायुक्त शिरिष दीक्षित यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसंच आतापर्यंत पालिकेतील १०० हून अधिक कर्मचा-यांचा कोरोनानं बळी घेतला आहे.

 

News English Summary: An officer of H East ward in Bandra East-Khar, who had the best performance in Mumbai regarding corona, has died. The death of Ashok Khairnar (age 57), assistant commissioner of H East ward, has caused a stir. A few days ago, Ashok Khairnar’s Covid 19 Test came positive.

News English Title: BMC assistant commissioner Ashok Hhairnar died due to corona virus News Latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या