राजस्थान सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्र भाजपने ५०० कोटी जमा केल्याचा आरोप बिनबुडाचा - दरेकर

मुंबई, १८ जुलै: राजस्थानातील आमदारांना विकत घेऊन काँग्रेस सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमवले आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता.
यासंदर्भात बोलताना श्री. सावंत म्हणाले, केंद्रातील भाजपचे सरकार सत्ता पैसा आणि सीबीआ, ईडी, प्राप्तीकर यांचा वापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते यासाठी वापरले जात आहेत. कर्नाटकातील काँग्रेस जेडीएसचे सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा वापर केला गेला आहे. कर्नाटकच्या आमदारांना भाजप सरकारच्या काळात मुंबईच्या हॉटेलात पोलिस बंदोबस्तात डांबून ठेवले होते. महाराष्ट्रातील भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्याच्या घरी यासंदर्भातल्या बैठका होत होत्या, हे राज्यातील जनतेने पाहिले आहे.
आताही महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमा करून राजस्थान सरकार पाडण्यासाठी पाठविले आहेत, अशी खात्रीशीर माहिती आपल्याला मिळाली असून आपण यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे असं सचिन सावंत म्हणाले होते.
दरम्यान, या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेत सचिन सावंत यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. सावंत यांचा आरोप अत्यंत बिनबुडाचा आणि तथ्यहीन आरोप आहे. असा आरोप करणाऱ्यांना सांगणं आहे की, आमदार हे लोकप्रतिनिधी असतात. तुमच्या पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेला आमदार हा विकला जातो, तुमच्यासाठी तो विकाऊ वस्तू असल्याची टीका दरेकर यांनी काँग्रेसवर केली. तसेच काँग्रेसच्या नेत्यांची अलीकडच्या काळात जी वक्तव्ये होत आहेत ती कोरोनामध्ये महाराष्ट्र सरकार तथा महाविकासआघाडी सरकारला आलेले अपयशापासून लक्ष विचलित करण्यासाठी आहेत. कधी भाजप सरकार पाडतंय, कधी राजस्थानला मदत करतोय अशा प्रकारची निराधार वक्तव्य करण्याची स्पर्धा काँग्रेसमध्ये लागल्याचे शंका येत असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
बिनबुडाचे आरोप करुन सचिन सावंत आपल्या वरिष्ठांना खुश करु शकतात, राजकीय स्पर्धेत काही मिळवण्यासाठी त्यांना या सगळ्याचा उपयोग होईल. तसेच विधान परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सचिन सावंत अशाप्रकारची वक्तव्ये करत असतील. परंतु, अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे जनतेमध्ये आपली प्रतिमा ही बिनबुडाचे आरोप करणारा प्रवक्ता अशी होईल याचे भान असावे. म्हणूनच सावंत यांच्यासारख्या होतकरु नेत्याने बोलताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असा सल्लाही दरेकर यांनी दिला.
News English Summary: Sachin Sawant, general secretary and spokesperson of the Pradesh Congress Committee, had alleged that BJP leaders in Maharashtra had collected Rs 500 crore from builders and businessmen to overthrow the Congress government by buying MLAs from Rajasthan.
News English Title: BJP leaders in Maharashtra had collected Rs 500 crore from builders and businessmen to overthrow the Congress government by buying MLAs from Rajasthan said Sachin Sawant News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE