13 May 2025 11:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | जबरदस्त अपसाईड कमाई होईल, शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH SBI Mutual Fund | पगारदार वर्ग या फंडातून 4-5 पटीने परतावा मिळवतोय, फंडाचे नाव सेव्ह करा, करोडोत कमाई Jio Finance Share Price | जिओ मेरे लाल! तुटून पडले गुंतवणूदार, शेअर्समध्ये 5.38% तेजी, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Adani Power Share Price | खुशखबर, 48% परतावा मिळवा, अशी संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ADANIPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनीचा शेअर देऊ शकतो मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL BEL Share Price | असा शेअर पोर्टफोलिओमध्ये असावा, मिळेल मोठा परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: BEL
x

कांदा निर्यात बंदीने राज्य भाजपचीही कोंडी | पवारांसोबत दानवे पंतप्रधानांची भेट घेणार

BJP MP Raosaheb Danve, NCP Chief Sharad Pawar, Onion Producer Farmers, Marathi News ABP Maza

मुंबई, १८ सप्टेंबर : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात बंदी घोषित केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी याचा विरोध केला आहे. कांदा उत्पादकांना याचा जबर फटका बसणार असल्यानं महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांसह भाजपातील नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आता, केंद्रीयमंत्री आणि भाजापा नेते रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली आहे. या प्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याचं दानवेंनी सांगितलं.

एबीपी माझाशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की, “राज्यात साखर कारखान्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कारखान्यांचे अकाऊंट एनपीएमध्ये गेले आहेत. अशा परिस्थितीत हे कारखाने सुरु करण्यासाठी बँका पैसे उपलब्ध करुन देण्यास तयार नाहीत. ऊसाचं पीक यावर्षी मोठ्या प्रमाणात आलं आहे. पुढच्या काळात शेतकरी अडचणीत येऊ नये. त्याचा संपूर्ण ऊस गाळला जावा यासाठी बँकांशी काय चर्चा करता येईल? राज्य सरकारने काय केलं पाहिजे? केंद्र सरकारच्या नेत्यांना भेटून काही करता येईल का? या विषयावर माझी आणि पवारांची चर्चा झाली”.

देवेंद्र फडणवीस पियुष गोयल यांना पत्र लिहले असून आता रावसाहेब दानवे यांनीही राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची भेट घेतली. तसेच, मंगळवारनंतर शरद पवार आणि माझ्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेणार असल्याचंही दानवे यांनी सांगितलं. दानवे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन शरद पवारांच्या भेटीचा फोटो शेअर करत, यासंदर्भात माहिती दिली.

 

News English Summary: Raosaheb Danve also called on senior state MP Sharad Pawar to learn about the problems of farmers in the state. He also said that a delegation led by Sharad Pawar and Prime Minister Narendra Modi would meet him on Tuesday. Danve shared a photo of Sharad Pawar’s visit from his Twitter account.

News English Title: BJP MP Raosaheb Danve On Meeting With NCP Chief Sharad Pawar Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या