2 May 2024 9:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Paytm App गुगल-प्ले स्टोअरवरून गायब | ऑनलाइन जुगारासंदर्भातील नियमांचे उल्लंघन

Paytm Android App, Google play store, policies on gambling, Marathi News ABP Maza

मुंबई, १८ सप्टेंबर : सर्वात लोकप्रिय पेमेंट ऍप असलेलं Paytm रहस्यमयरीत्या गुगल प्ले स्टोअरवरून गायब झाले आहे. गुगल प्ले स्टोअरवर सर्च केल्यानंतर पेटीएम ऍप सापडत नाहीये. One97 Communications Limited कंपनीच्या मालकीची इतर ऍप गुगल प्ले स्टोअरवर सापडत आहेत. पेटीएम बिझनेस, पेटीएम मनी, पेटीएम मॉल आणि अन्य कंपनीच्या मालकीचे इतर ऍप्स अद्याप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे Paytm ऍपल स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

गुगलने यासंदर्भात आपल्या ब्लॉगमध्ये माहिती दिली आहे. लाखो युझर्स असणाऱ्या पेटीएमवर कारवाई करण्यामागे कंपनीने ऑनलाइन जुगारासंदर्भातील नियमांचे कारण दिलं आहे. “आम्ही ऑनलाइन कसिनो किंवा नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावण्यासाठी पुरवण्यात येणारी जुगाराची सेवा देणाऱ्या अ‍ॅपला परवानगी देत नाही. एखाद्या ग्राहकाला आपल्या प्लॅटफॉर्मवरुन बाहेरील वेबसाईटवर ऑनलाइन जुगारासाठी जाण्यास परवानगी देणारी सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या अ‍ॅपचाही यामध्ये समावेश होतो. अशाप्रकारच्या देवाणघेवाणीमधून पैसे तसेच रोख रक्कम बक्षीस म्हणून देणे हे आमच्या नियमांच्या विरोधात आहे,” असं गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, Googleने पेटीएमला प्ले स्टोअरवरून हटवण्याची कल्पना डेव्हलपरला दिली होती. प्ले स्टोअरवर अ‍ॅप परत मिळविण्यासाठी पेटीएमच्या संपर्कात असल्याचंही गुगलनं सांगितलं आहे. पेटीएमची मालकी One97 Communications Limited या भारतीय कंपनीकडे आहे, त्याची स्थापना विजय शेखर शर्मा यांनी केली होती, पण चीनच्या अलिबाबा समूहाशी पेटीएमनं भागीदारी केली होती, त्यामुळे पेटीएमला फिन्टेक कंपनी अँड फायनान्शिएल्सकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला होता.

 

News English Summary: Google has taken down the Paytm app from the Play Store while other apps like Paytm for Business, Paytm mall, Paytm Money, and a few more are still available for download. Commenting on the matter Paytm states, “Paytm Android app is temporarily unavailable on Google’s Play Store for new downloads or updates.” The reason for the removal is not clear yet, but in a blog post the tech giant referred to their policies on gambling.

News English Title: Paytm removed google play store reason given to their policies on gambling Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x