सुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्माची भली मोठी पोस्ट

मुंबई, २५ सप्टेंबर : माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी विराटच्या कामगिरीवर टिप्पणी करताना केलेल्या टीकेमुळे वाद निर्माण झाला आहे. आरसीबी आणि पंजाबमधील सामन्यादरम्यान समालोचन करताना सुनील गावसकर यांनी विराटवर टीका करताना अनुष्काचाही उल्लेख केला. विराटची सुमार कामगिरी बघून गावसकर यांनी “ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने” असं म्हटलं. गावसकर यांनी उपरोधिकपणे टीका केल्याने अनुष्का शर्मा नाराज झाली असून तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मानं भली मोठी पोस्ट लिहिली. विराट कोहलीच्या कामगिरीवरून स्वतःचं नाव खेचल्यानं अनुष्का नाराज झाली. तिनं लिहिलं की,”तुम्ही केलेली कमेंट त्रासदायक आहे, परंतु पतीच्या कामगिरीवर पत्नीला जबाबदार धरण्याचं विधान का केलंत, याचं उत्तर मला द्यायला आवडेल. गेली अनेक वर्ष एखाद्या क्रिकेटपटूच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना तुम्ही त्याच्या खाजगी आयुष्याचा आदर केला असेलच, याची मला खात्री आहे. मग, तुम्हाला असं वाटत नाही का आम्हालाही तसाच समान आदर मिळायला हवा? माझ्या पतीच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना तुमच्या डोक्यात शब्दांचा भंडार नक्कीच होता किंवा तुमचं ते विधान माझ्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हतं का?”
”2020वर्ष आलं, परंतु माझ्यासाठी काहीच बदललेलं नाही. माझं नाव क्रिकेटमध्ये ओढणं कधी थांबेल आणि अशा कमेंट कधी थांबतील? गावस्कर तुम्ही या जंटलमन्स खेळाचे दिग्गज खेळाडू आहात. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की, तुमच्या विधानानं दुःख झाले,”असेही अनुष्का म्हणाली.
सुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मानं भली मोठी पोस्ट लिहिली.@IPL @AnushkaSharma @imVkohli pic.twitter.com/cezsNNuYqE
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) September 25, 2020
नेमकं काय झालं होतं?
२४ सप्टेंबर २०२० रोजी पंजाबविरोधातील सामन्यादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहली पूर्णपणे अपयशी ठरला. क्षेत्ररक्षणावेळी त्याने राहुलचे दोन झेल सोडले तर फलंदाजी करताना अपयशी ठरला. कोहली फक्त एक धाव काढून शेल्डन कॉट्रेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेसी फलंदाजी करण्यात अपयश आलं. यावेळी भारताचे माजी कर्णधार आणि आयपीएलमधील समालोचक सुनील गावसकर यांनी विराट कोहलीच्या अपयशाचा समाचार घेताना म्हटलं की, “ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने”. तर, “इन्होंने लॉकडाउनमे तो बस अनुष्काकी गेंदों की प्रॅक्टिस की है” असं न बोललेलं वाक्य गावसकरांच्या तोंडी घालत टीकेचा भडिमार केला आहे.
News English Summary: Actress Anushka Sharma on Friday took to Instagram and posted a message directed towards Indian cricket legend Sunil Gavaskar. The message comes a day after Gavaskar involved Anushka’s name while commentating during the IPL match between Royal Challengers Bangalore and Kings XI Punjab.
News English Title: Bollywood actress Anushka Sharma reaction on Sunil Gavaskar statement on Virat Kohli Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या गतीने कमाई होईल; पीएसयू शेअरबाबत फायद्याची अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC