1 May 2025 4:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

आपल्या मुलींवरील चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकता | युपीचा भाजप आमदार बरळला

Only Sanskaar, Stop Rape Incidents, Ballias BJP MLA Surendra Singh, Hathras Gang Rape

लखनऊ, ४ ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी एका युवतीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर तिच्यावर हल्लाही झाला. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. योगी सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे.

हाथरस प्रकरणावरुन उत्तर प्रदेश सरकार, भाजपा आणि मोदी सरकारवर टीका होते आहे. अशात भाजपा आमदार सुरेंद सिंह यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी धक्कादायक मत व्यक्त केलं आहे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात येतं आहे.

सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. “आपल्या मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात. अशा घटनांना शासन आणि तलवारी रोखू शकत नाहीत” असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये रामराज्याचा दावा केला जात असताना बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. यामागचं कारण काय? असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

 

News English Summary: Bharatiya Janata Party’s MLA from Uttar Pradesh Surendra Singh on Saturday said that the parents of young women must inculcate good values in them to stop incidents of rape, ANI reported. His remark came amid nationwide outrage over the death of a 20-year-old Dalit woman from the state’s Hathras district, after four upper caste Thakur men raped and tortured her. “Such incidents can be stopped only with sanskar [culture and values] and not with shashan or talwar,” Singh, who is an MLA from the state’s Ballia district said.

News English Title: Parents should teach good values to women to stop rape says BJP MLA Surendra Singh on Hathras Gang Rape Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या