3 May 2025 2:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

भारतीय बनावटीच्या विमानाची गोपनीय माहिती ISI'ला दिली | एटीएसकडून एकाला अटक

Man Arrested, Nashik, NIA, Pakistan ISI

नाशिक, ९ ऑक्टोबर : पाकिस्तानच्या आयएसआयला माहिती पुरवणाऱ्याला नाशिकमध्ये अटक करण्यात आली आहे.नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाला या व्यक्ती बाबत गोपनीय माहिती मिळाली होती. एचएएल अर्थात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानं तयार करणाऱ्या कंपनीविषयीची संवेदनशील माहिती हा माणूस माहिती पुरवत होता. ज्याला अटक करण्यात आली आहे तो हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीत कर्मचारी होता. हा कर्मचारी पाकिस्तानच्या आय. एस. आय. गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात असून भारतीय बनावटीच्या विमानांची, विमानांच्या संवेदनशील तांत्रिक तपशीलाची, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या नाशिक येथील विमान कारखान्याची तसेच कारखाना परिसरातल्या प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला पुरवत होता.

मिळालेल्या माहितीवरून सखोल चौकशी केली असता असे निदर्शनास आले की, ओझर, नाशिक स्थित भारतीय बनावटीची विमाने बनविणाऱ्या “हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड” या कंपनीमधील एक कर्मचारी आरोपी हा पाकिस्तानच्या ISI या गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्या विमानांची, विमानाच्या संवेदनशील तांत्रिक तपशिलाची, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या नाशिक येथील विमान कारखान्याची, सदर कारखाना परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांची तसेच ट्रे गोपनीय माहिती पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संघटनेस पुरवत होता.

त्यावरून त्याच्या विरुद्ध कलम ३, ४, आणि ५ शासकीय गुपिते अधिनियम १९२३ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून 3 मोबाइल हँडसेट, ५ सिमकार्ड, दोन मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहे. सदर साहित्य विश्लेषणासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी येथे पाठवण्यात आले आहेत.आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

 

News English Summary: An employee of the state-run Hindustan Aeronautics Ltd (HAL), Nashik has been arrested by the Anti-Terrorism Squad (ATS) on charges of spying for Pakistan. The HAL employee was arrested by the Nashik unit of the Maharashtra ATS for supplying secret information to Pakistan’s spy agency, the Inter-Services Intelligence. The ATS said the arrested employee was supplying information about Indian fighter aircraft and their manufacturing unit at HAL Nashik.

News English Title: Man Arrested In Nashik For Providing Information To Pakistan ISI Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NIA(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या