महाविकास आघाडी सरकार मिनिमम कॉमन हिंदुत्वावर | मनसेचा खोचक टोला

मुंबई, १३ ऑक्टोबर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदुत्त्वाची आठवण करून दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना खरमरीत शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात याच पार्श्वभूमीवर सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या वादात उडी घेतली आहे. “महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्यावेळेस मिनिमम काँमन प्रोग्रॅम ठरला होता. मात्र, हे सरकार मिनिमम कॉमन हिंदुत्वावर गेले आहे”, अशी टीका मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.
राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजप प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजपकडून आज (१३ ऑक्टोबर) राज्यव्यापी आंदोलन देखील करण्यात आले होते. याच विषयी राज्यपालांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत त्यांच्या हिंदुत्त्वावर प्रश्न उपस्थित केल्याने मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनी खरमरीत शब्दांत उत्तर दिले. यामुळे,मुख्यतः शिवसेना भाजपमधील वाद पेटलेला असतानाच मनसेने देखील आता मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
“राज्यात मॉल उघडले जातात मग मंदिरं का बंद ठेवली जातात ?” असा सवाल उपस्थित करत “कोरोनासारख्या संकटाच्या काळात देवाचा आधार असतो. यामुळे मंदिर उघडली गेली पाहिजेत”, अशी मागणी संदीप देशपांडेंनी केली आहे. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळ मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आले होते.त्यानंतर राज ठाकरेंनी देखील मंदिरे उघडण्याची मागणी केली होती.
News English Summary: After Governor Bhagat Singh Koshyari reminded us of Hindutva, Chief Minister Uddhav Thackeray has responded to the Governor in harsh words. Against this backdrop, the Maharashtra Navnirman Sena (MNS) has also jumped into the fray. When the Mahavikas Aghadi government was formed, it was a minimum common program. However, this government has gone for minimum common Hindutva, said MNS general secretary Sandeep Deshpande.
News English Title: Mahavikas Aghadi government on minimum common Hindutva says MNS leader Sandeep Deshpande News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL