3 May 2025 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

संपूर्ण गुजरात काँग्रेस २५ कोटींना खरेदी केली जाऊ शकते | विजय रूपानी यांचं वक्तव्य

Gujarat Chief Minister Vijay Rupani, Rahul Gandhi, Gujarat congress

गांधीनगर, २९ ऑक्टोबर: सध्याच्या काँग्रेसजवळ महात्मा गांधींचे आदर्श नाहीत, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुरुवारी एका मेळाव्यात सांगितले. निवडणुकांमध्ये भाजपा अनैतिकपणे वागत असल्याचा आरोप गुजरात काँग्रेसकडून करण्यात आला, याला उत्तर मुख्यमंत्र्यांनी सुरेंद्रनगरजवळील लिंबडी येथील मोर्चात संबोधित करताना दिले. विजय रूपाणी यांनी बुधवारी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार केला. यावेळी आज काँग्रेस महात्मा गांधींच्या गुणांपासून खूप लांब आहे. आजची काँग्रेस महात्मा गांधीची नाही तर फक्त राहुल गांधींची आहे, असे विजय रुपाणी म्हणाले.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, काँग्रेसच्या माजी आमदाराला २५ कोटी रुपयांना खरेदी केले आणि तिकिट दिले, असा आरोप काँग्रेसकडून भाजपावर करण्यात आला होता. यावर उत्तर देताना विजय रुपाणी यांनी म्हटले की, काँग्रेस आपल्या आमदारांचा सन्मान करत नाही आणि पक्ष सोडल्यानतंर असे आरोप केले जातात. तसेच, संपूर्ण गुजरात काँग्रेसला २५ कोटी रुपयांत खरेदी केले जाऊ शकते, असे विजय रुपाणी म्हणाले.

तत्पूर्वी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवरून ठाकरे सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला टीकेचे धनी केले होते. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती ‘भगवान भरोसे’ असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

“आम्ही गुजरातेत कोरोना परिस्थिती आटोक्यात ठेवली. बाजूचं राज्य असलेल्या महाराष्ट्रात कोरोनामुळे ४५ हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले. महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये कोरोना बेड्स उपलब्ध नाहीत, तिकडे रुग्ण रस्त्यावर हिंडतात. कोरोनाबाधितांचे मृतदेह महाराष्ट्रात रस्त्याच्या कडेला पडलेले सापडतात.” असा आरोप रूपाणी यांनी केला होता.

 

News English Summary: Gujarat Chief Minister Vijay Rupani has once again targeted the Congress. At a rally in Limbdi near Surendranagar, the CM targeted former Congress President Rahul Gandhi and said that the party no longer has the ideals of Mahatma Gandhi. He was reacting to the allegations leveled against the Gujarat Congress by the BJP. He said that the entire Gujarat Congress can be bought for Rs 25 crore.

News English Title: Gujarat Chief Minister Vijay Rupani attacks on Rahul Gandhi said entire Gujarat congress can buy only for 25 crore News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या