7 May 2025 4:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

सुप्रीम कोर्टाचा भाजपला झटका, बहुमत उद्याच सिद्ध करा

कर्नाटक : आज सकाळ पासूनच सर्वोच न्यायालयात कर्नाटकातील सत्तास्थापनेवरून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु होती. त्यात चर्चेअंती सर्वोच न्यायालयाने उद्या म्हणजे शनिवारी संध्याकाळी ४ वाजता बहुमत सिद्ध करावे असे थेट आदेश भाजपला सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

महत्वाचं म्हणजे भाजपने बहुमताची चाचणी सोमवारी घ्यावी अशी मागणी सर्वोच न्यायालयाकडे केली होती. परंतु सर्वोच न्यायालयाने भाजपची ही मागणी फेटाळून लावली आहे. कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी बुधवारी रात्री भाजपला राज्यात सत्तास्थापनेसाठी पाचारण केले होते. त्याला जेडीएस आणि काँग्रेसने सर्वोच न्यायालयात आवाहन दिले होते.

संपूर्ण सुनावणी झाल्यावर भाजपला जास्त वेळेची मर्यादा न देता शनिवारी संध्याकाळी ४ वाजता बहुमत सिद्ध करावे असे थेट आदेश भाजपला सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता भाजप समोरील समस्या वाढल्या असून त्यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी २४ तासाहून सुद्धा कमी वेळ असून विरोधी पक्षांची मत फोडण्याचे मोठे आवाहन त्यांच्यापुढे आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या