3 May 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट
x

आमच्या विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं | RJD चा गंभीर आरोप

Bihar Assembly Election 2020, vote counting, RJD

पाटणा, १० नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Bihar Assembly Election 2020 vote counting) सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी बढत घेतली होती. मात्र, नंतर हे चित्र बदललं. दुपारी तीनपर्यंत एनडीएने महाआघाडीला पिछाडीवर टाकत १२८ जागांवर आघाडी घेतली. यात ७३ ठिकाणी भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. तर JDU ४९, व्हीआयपी ५ व हम एका जागेवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाआघाडी (MahagathBandhan) सध्या १०५ जागांवर आघाडी आहे. RJD’चे ६७ उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसने २०, तर डाव्यांनी १८ जागांवर आघाडी घेतली आहे. बसपा आणि एमआयएमचे प्रत्येकी दोन उमेदवार आघाडीवर आहेत.

बिहारमधल्या १०३ जागांचे निकाल लागले आहेत. यामध्ये एनडीएने ५४ जागा जिंकल्या आहेत. ५४ पैकी ३२ जागा भारतीय जनता पक्षाने १९ जागा जदयूने तर HAM ने एक जागा जिंकली आहे. ६९ जागी NDA’ची आघाडी आहे. तर महाआघाडीने ४४ जागी विजय मिळवला आहे. यापैकी २९ जागी राजदने, ७ जागी काँग्रेसने आणि डाव्यांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. महाआघाडीनेही ६९ जागी आघाडी घेतली आहे. त्यामुळे सत्तेसाठीची रस्सीखेच दोहोंमध्येही पाहण्यास मिळते आहे.

दुसरीकडे, अद्याप बहुतेक जागांवरचे अंतिम निकालाची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. मात्र, या दरम्यान तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाकडून मतमोजणीत गोंधळ होत असल्याचा आरोप करण्यात आलाय.

राष्ट्रीय जनता दलानं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आपल्या उमेदवारांची एक यादीच प्रसिद्ध केलीय. ‘ही त्या ११९ मतदारसंघांची यादी आहे जिथे मतमोजणी संपूर्ण झाल्यानंतर महाआघाडीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. रिटर्निंग अधिकाऱ्यांनी त्यांना विजयाच्या शुभेच्छाही दिल्या परंतु, आता मात्र ते सर्टिफिकेट न देता पराभूत झाल्याचं उमेदवारांना सांगत आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही त्यांना विजयी घेषित करण्यात आलं. लोकशाही अशी लुटालूट चालणार नाही’ असं आरजेडीनं या ट्विटमध्ये म्हटलंय.

 

News English Summary: The Rashtriya Janata Dal has just released a list of its candidates from its official Twitter account. This is the list of those 119 constituencies where the candidates of the Grand Alliance have won after the completion of the counting of votes. Returning officers also wished him victory, but now he is telling the candidates that he lost without giving a certificate. He was also declared the winner on the Election Commission’s website. Democracy will not be looted like this’, RJD said in this tweet.

News English Title: Bihar Assembly Election 2020 voting counting RJD made serious allegations news updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x