4 May 2025 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY Trident Share Price | शेअर प्राईस केवळ 26 रुपये; यापूर्वी दिला 5230% परतावा; फायद्याची अपडेट आली - NSE: TRIDENT Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER
x

मोदी सरकार, हट्ट सोडा! | आगीशी खेळ करू नका | शेतकरी नेत्यांचा इशारा

Farmer protest, rejected amendment, Modi government, Farm Laws

नवी दिल्ली, २३ डिसेंबर: नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन अजुनही सुरूच आहे. तीनही कायदे रद्द करा अशी शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे. याच मुद्यांवर शेतकरी संघटना अडून बसल्या आहेत. तर कायदे रद्द होणार नाहीत अशा भूमिकेवर सरकार ठाम आहे. त्यामुळे हा पेच कसा सुटणार असा सवाल आता विचारला जातोय. आतापर्यंतच्या चर्चेच्या फेऱ्यांमधून फार काहीच निघालं नाही. मागील २८ दिवसांपासून आंदोलक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसले आहेत. त्यानंतरही पुन्हा एकदा ही चर्चा सुरू व्हावी यासाठी सरकारला प्रयत्न आहे. (For the last 28 days, agitating farmers have been protesting on the Delhi border. Even after that, the government is trying to get the discussion started again)

मोदी सरकार, हट्ट सोडा! आगीशी खेळ करू नका, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. शेतकरी नेत्यांनी सरकारच्या प्रस्तावावर आज सिंघु सीमेवर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. अन्य राज्यांमध्ये कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरु आहे. ते एवढे ताकदीचे नाहीय. हे आंदोलन आणखी तीव्र करण्यास सांगितले जाणार आहे. याचबरोबर सरकारकडे गुप्तहेर आहेत, त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. एवढेच नाही तर राजस्थान, गुजरातहून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलकांना येऊन मिळाले आहेत, असे या नेत्यांनी सांगितले.

भारतीय किसान युनियनचे युद्धवीर सिंह यांनी सांगितले की, ज्या प्रकारे केंद्र ही चर्चा पुढे नेत आहे, त्यावरून हे स्पष्ट होतेय की सरकार मुद्दामहून विलंब करू पाहत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल तुटेल असा प्रयत्न आहे. सरकार आमचे मुद्दे हलक्यात घेत आहे. लवकरात लवकर या प्रकरणावर तोडगा काढावा हा आमचा इशारा आहे. सरकारने आगीशी खेळू नये आणि हट्ट सोडून आमची कायदे रद्द करण्याची मागणी ऐकावी. government should not play with fire and leave the hut and listen to the demand to repeal our laws said Yudhveer Singh the leader of Indian Farmers’ Union.

 

News English Summary: Yudhveer Singh of the Indian Farmers’ Union said the way the Center was taking the discussion forward, it was clear that the government was deliberately trying to delay it. This is an attempt to break the morale of the farmers. The government is taking our issues lightly. We urge you to resolve this issue as soon as possible. The government should not play with fire and leave the hut and listen to the demand to repeal our laws.

News English Title: Farmer protest rejected Modi government offer of amendment in farm laws news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या