3 May 2025 11:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN
x

कथित पत्रकाराला भाजपच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं दिसतंय

NCP MLA Rohit Pawar, Arnab Goswami, Partho Dasgupta, Whatsaap leaked

मुंबई, १६ जानेवारी: ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटने खळबळ माजली आहे आणि त्यामुळे अर्णब गीस्वामी यांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण TRP घोटाळ्यासंदर्भातील व्हाट्सअँप चॅट समाज माध्यमांवर सार्वजनिक झालं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे चॅट रेटिंग एजन्सी बार्कचे सीईओ आणि अर्णब गोस्वामी यांच्यादरम्यानच असून, त्यातील विषय हा TRP घोटाळ्यासंबंधित असल्याने अर्णब गोस्वामी पूर्णपणे फसल्याची चर्चा आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही या संवादावरून भारतीय जनता पक्षाला सवाल केला आहे. अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे याची चर्चा सुरू झाली. दोघांमधील संवादामध्ये मंत्र्याबद्दलही आक्षेपार्ह विधान करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर बालाकोट एअर स्ट्राईकबद्दलही संवाद झालेला असून, रोहित पवारांनी याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारला आहे.

कथित पत्रकाराला भाजपच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं त्यांच्या चॅटिंगवरुन दिसतंय. भाजपच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का? एखाद्या निर्णयापूर्वीच अशा प्रकारे माहिती लिक होत असेल तर देशविरोधी शक्तीही याचा फायदा उठवू शकतात. हे लोकशाहीला घातक आहे, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

News English Summary: NCP MLA Rohit Pawar has also questioned the BJP over the dialogue. After the WhatsApp conversation between Arnab Goswami and Partho Dasgupta went viral, the discussion started everywhere. In the dialogue between the two, offensive statements have also been made about the minister. There has also been talk of a Balakot air strike, with Rohit Pawar questioning the BJP on the same issue.

News English Title: NCP MLA Rohit Pawar criticised BJP after Arnab Goswami and Partho Dasgupta Whatsaap leaked news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या