2 May 2025 4:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

लस दिलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू | पण मृत्यूचं कारण दुसरं | तेलंगणा सरकारचं स्पष्टीकरण

Telangana, Corona Vaccination

हैदराबाद, १९ जानेवारी: कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या तेलंगणमधील ४२ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा बुधवारी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने स्पष्टीकरण दिलं असून कोरोनी लसीचा मृत्यूशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. आरोग्य कर्मचाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अद्याप अहवाल मिळालेला नाही. (A 42 year old health worker dead in Telangana who was vaccinated against corona)

तेलंगणमधील सार्वजनिक आरोग्य आणि कल्याण विभागाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, “१९ जानेवारीला या आरोग्य कर्मचाऱ्याला लस देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्याच्या छातीत दुखू लागलं होतं. पहाटे ५.३० वाजता रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता”. याआधीही दोन्ही वेळा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची शक्यता फेटाळली होती.

दुसरीकडे महाराष्ट्रात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबार उपक्रमासाठी आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी राज्यातील कोविड लसीकरणाबाबत टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली. राज्यात पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. अॅप संथगतीने चालत असल्याने काहीशी आडकाठी येत आहे. लाभार्थींची दुबार नावेही जात आहेत.

या सगळ्या गोष्टींमुळे लोकांच्या मनात थोडासा गोंधळ होणे स्वाभाविक आहे. म्हणून ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त करण्याचे काम केंद्रस्तरावर सुरू आहे. केंद्राच्या या गोष्टी वारंवार निदर्शनास आणून दिल्या आहेत आणि निश्चितच या त्रुटी दूर होतील, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला. व्हॅक्सीनबाबत चुकीचे विधान वा माहिती माध्यमांतून जाऊ नये आणि कन्फ्युजन होऊ नये याची काळजी माध्यमांनी घ्यावी, असे आवाहनही राजेश टोपे यांनी यावेळी केले.

 

News English Summary: A 42-year-old health worker from Telangana, who was vaccinated against corona, died on Wednesday. The state government has given an explanation after the death of the health worker and claimed that the coronary vaccine had nothing to do with the death. The body of the health worker has been sent for autopsy and no report has been received yet.

News English Title: A 42 year old health worker dead in Telangana who was vaccinated against corona news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या