2 May 2025 9:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

सरकारला ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली | अन्यथा ४० लाख ट्रॅक्टर घेऊन देशभरात रॅली

Former leader Rakesh Tikait, Modi government

नवी दिल्ली, ०३ फेब्रुवारी: मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी दिल्लीमध्ये शिरु नयेत म्हणून दिल्लीच्या सीमांवर म्हणजेच सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तिन्ही ठिकाणी चार ते पाच फूट उंचीच्या सुरक्षा भिंती दिल्ली पोलिसांनी उभारल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गांवर काँक्रीटचं बांधकाम करत या भिंती उभारुन दिल्ली पोलिसांनी संयुक्त किसान मोर्चामधील आंदोलकांनी दिल्लीमध्ये घुसू नये म्हणून ही नाकाबंदी केलीय. या भिंतीच्या पलीकडेही दीड किलोमीटरपर्यंत वेगवेगळे अडथळे उभारत बॅरिकेट्, खिळे, लोखंडी खांब, तारा टाकून प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

यादरम्यान भारतीय किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला निर्णय घेण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला असून भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्याचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारने जर आमच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही मोठी ट्रॅक्टर रॅली काढू असं ते म्हणाले आहेत.

आम्ही सरकारला ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. जर त्यांनी आमचं ऐकलं नाही तर आम्ही ४० लाख ट्रॅक्टर घेऊन देशभरात रॅली काढू. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आम्ही प्रवास करु. येथील आंदोलनदेखील सुरु राहणार. जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत माघार घेणार नाही,” असं राकेश टिकैत यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं आहे. झारखंडचे कृषीमंत्री बादल पारेख यांनी गाझीपूर सीमेवर भेट घेतल्यानंतर राकेश टिकैत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

 

News English Summary: We have given the government until October. If they don’t listen to us, we will take 4 million tractors and rally across the country. We will travel from one state to another. The agitation here will also continue. We will not back down until the law is repealed, ”Rakesh Tikait told ANI. Rakesh Tikait made the statement after Jharkhand Agriculture Minister Badal Parekh met him at the Ghazipur border.

News English Title: Former leader Rakesh Tikait gave time to Modi government till October news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या