Alert Fake FASTag | फास्टॅगच्या फसवणुकीबाबत NHAI'चा अलर्ट | कुठे खरेदी कराल

मुंबई, १८ फेब्रुवारी: भारत सरकारने टोल टॅक्ससाठी फास्टॅग (FASTag) अनिवार्य केले आहे. जर आपण राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असाल तर आपल्या कारला फास्टॅग असणे बंधनकारक आहे, अन्यथा आपल्याला टोल भरण्यात अडचण येऊ शकते. फास्टॅगच्या अनिवार्यतेमुळे त्याची विक्रीदेखील लक्षणीय वाढली आहे आणि यामुळेच त्याबाबत होणारी फसवणूक देखील वाढत आहे. म्हणूनच फास्टॅग घेताना सतर्क राहणे आवश्यक आहे. एनएचएआय (NHAI) अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही बनावट फास्टॅगच्या वाढत्या प्रकरणाबाबत अलर्ट जारी केला आहे.
एनएचएआयने माहिती दिली आहे की, एनएचएआय किंवा आयएचएमसीएलच्या नावावर बनावट फास्टॅग विकले जात आहेत. हे फास्टॅग दिसायला अगदी एनएचएआय किंवा आयएचएमसीएलच्या फास्टॅगप्रमाणेच आहेत, मात्र त्यांचा काही उपयोग होणार नाही. वैध ऑनलाइन फास्टॅग केवळ www.ihmcl.co.in या वेबसाइटवर किंवा MyFASTag App द्वारे खरेदी केले जाऊ शकतात. या व्यतिरिक्त ग्राहक फास्टॅग बँक व अधिकृत पीओएस बँकेच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकतात. जिथून फास्टॅग खरेदी केले जाऊ शकतील अशा बर्याच वेबसाइटची माहिती आयएचएमसीएल वेबसाइटवर दिली गेली आहे.
कोणत्याही अज्ञात ठिकाणाहून कोणीही फास्टॅग करू नये अशी माहितीही एनएचएआयने आपल्या संकेतस्थळावर दिली आहे. फास्टॅग फसवणुकीची कोणतीही घटना समोर आल्यास एनएचएआयची हेल्पलाईन 1033 वर संपर्क साधा किंवा [email protected] वर माहिती पाठवण्याचे आवाहन केले आहे.
म आणि एन श्रेणीच्या वाहनांसाठी शासनाने फास्टॅग अनिवार्य केले आहे. यात चारपेक्षा जास्त चाके असलेली वैयक्तिक वाहने किंवा माल वाहून नेणारी वाहने समाविष्ट आहेत. जर तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. दरम्यान, आपण टोल पास करताच आपल्या फास्टॅग खात्यातून पैसे कट केले जातात, ज्याची माहिती एसएमएसद्वारे आपल्या मोबाइलवर दिली जाते. मेसेजमध्ये टोलचे नाव, तारीख, रक्कम आणि फास्टॅग शिल्लक याबद्दल माहिती आहे.
News English Summary: According to NHAI, fake fastags are being sold in the name of NHAI or IHMCL. These fastags look exactly like NHAI or IHMCL’s fastags, but they are of no use. Valid online fastags can be purchased only on the website www.ihmcl.co.in or through the MyFASTag App. In addition, customers can make purchases from the websites of Fastag Bank and the official POS Bank. The IHMCL website lists many websites from which fastags can be purchased.
News English Title: Fake fastag NHAI issues alert for fraud find out exactly where to buy news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL