3 May 2025 6:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

पुणे महापालिकेची नवी इमारत की ठिबक सिंचन प्रकल्प?

पुणे : अति घाई संकटात नेई हे सर्वांना परिचित असेलच पण त्याचा प्रत्यय पुणे महापालिकेच्या नव्या इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमावेळी भाजपला आला आहे. भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे महानगर पालिकेच्या भोंगळ कारभाराच जिवंत चित्र समोर आलं आहे.

पुणे महानगर पालिकेच्या नव्या इमारतीचे काम पूर्ण होण्याआधीच ५० कोटी खर्चून उभ्या राहत असलेल्या या इमारतीच्या कामाच्या दर्जाची जाहीर कबुलीच निसर्गाने उपस्थितांना करून दिली आहे. कारण उदघाटनाच्या कार्यक्रमा दरम्यान बाहेर जोरदार पाऊस सुरुवात झाली आणि त्याच वेळी प्रमुख पाहुण्यांची भाषणं सुरु झाली व नव्या कोऱ्या सभागृहात पाण्याची गळती सुरु झाली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला कानाडोळा केला खरा, परंतु थेट घुमटातून गळणाऱ्या पाण्याचा आवाज होऊ लागला आणि सर्वत्र एकाच चर्चा रंगली.

महत्वाचं म्हणजे शहरातील महानगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणजे नगरसेवकांच्या आसनावर पाणी गळत असल्याने आसनावर चक्क पेपर अंथरून पाण्याची गळती झाकण्याचा केविलवाणा प्रयत्नं झाला आणि छायाचित्र सुद्धा प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे भाजपचे कौतुक होईल या उद्देशाने घाईघाईने केलेल्या उदघाटनामुळे उलट भाजप टीकेचे धनी ठरले आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या