4 May 2025 7:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

कोणालाही वाचवणार नाही | ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई होणार - उपमुख्यमंत्री

Deputy CM Ajit Pawar, Sachin Vaze

मुंबई, १६ मार्च: मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाच्या बाहेरुन स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली. यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्येही बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा वर्षा बंगल्यावर बैठका पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली.

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांसमोर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “सुरुवातीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे की कोणत्याही गोष्टींमध्ये चौकशी झाली पाहिजे. चौकशीनंतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यात कोणालाही पाठिशी घालण्याचे महाविकासआघाडी सरकारचे काहीही कारण नाही. सरकार तसं अजिबात होऊ करणार नाही. NIA आणि ATS अशा दोन यंत्रणा याप्रकरणी चौकशी करत आहेत. ज्या घटना पुढे येतात, त्यानुसार कारवाई करण्यात येईल,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेत्यांवर काही चुकीच्या बातम्या दिल्या गेल्या. त्यावेळी संध्याकाळपर्यंत कारवाई करुन अटक केली जाईल, असे सांगितलं होतं. त्यानुसार संध्याकाळी ही कारवाई केली गेली. त्याच पद्धतीने ही कारवाई केली जाईल. यात कुणाचाही हस्तक्षेप असता कामा नये. हीच सरकारची भूमिका आहे. जे कोणी दोषी असतील, ज्यांच्यापर्यंत हे धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल,” असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.

 

News English Summary: Deputy Chief Minister Ajit Pawar has commented in front of the media. He said, “From the beginning, Chief Minister Uddhav Thackeray has said that there should be an inquiry into any matter. After the inquiry, action will be taken against those who are guilty. There is no reason for the Mahavikasaghadi government to support anyone. The system is investigating the matter. Action will be taken according to the incidents that come up, ”explained Ajit Pawar.

News English Title: Deputy Chief Minister Ajit Pawar has commented in front of the media over Sachin Vaze case news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या