11 May 2025 8:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला महिना रु.7500, रु.6429, रु.5357 की रु.4286 पेन्शन मिळणार? अपडेट आली Horoscope Today | 11 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 11 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | खुशखबर! मल्टिबॅगर पेनी स्टॉक फोकसमध्ये, जोरदार तेजीचे संकेत - NSE: RPOWER NBCC Share Price | 28 टक्के कमाईची संधी मिळतेय, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC
x

नागपुर मिहान प्रकल्प | गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिल्लीत पवारांशी चर्चा

Home Minister Anil Deshmukh, Sharad Pawar, Nagpur Mihan Project

मुंबई, १९ मार्च: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ६ जनपथ या दिल्लीतील बंगल्यावर गृहमंत्री अनिल देशमुख सकाळी १० वाजताच्या सुमारास दाखल झाले होते. शरद पवार सध्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्ली येथे आहेत. गृहमंत्री आणि शरद पवारांच्या या भेटीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, मुंबई पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती जरी झाली असली तरी पुढे या प्रकरणात काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. दरम्यान, गेले काही दिवस राष्ट्रवादीच्याच पक्षातील काही नेते अडचणीत आल्याचं दिसून आल्याने पक्ष प्रमुख म्हणून शरद पवार आता काही ठोस भूमिका घेणार का याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, नागपुरातील मिहान प्रकल्पाविषयी चर्चेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली अशी माहित अनिल देशमुख यांनी प्रसार माध्यमांना दिली. आज सकाळी मी दिल्लीत आलो होतो. विदर्भात, नागपुरात मिहान प्रकल्प सुरु आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या इंडस्ट्रींचा येण्याचा विचार आहे. त्यामुळे आमच्या विदर्भात या इंडस्ट्री आल्या पाहिजेत, यासाठी पवार साहेबांची मदत घेण्यासाठी मी आलो होतो. पवार साहेबांना मिहान प्रकल्पाचे डिटेल्स दिले. त्यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा करत असताना, पवार साहेबांनी साहजिकच मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाची माहिती घेतली.” असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

 

News English Summary: Home Minister Anil Deshmukh had arrived at NCP president Sharad Pawar’s 6 Janpath bungalow in Delhi around 10 am. Sharad Pawar is currently in the capital Delhi on the sidelines of the convention. It is learned that during the meeting between the Home Minister and Sharad Pawar, the two discussed the current political situation in Maharashtra.

News English Title: Home Minister Anil Deshmukh meet Sharad Pawar at Delhi regarding Nagpur Mihan Project news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या