4 May 2025 3:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

फडणवीसांच्या काळात ते स्वत: न्यायाधीश होते | मंत्र्यांवर आरोप होताच ते क्लीन चीट द्यायचे

Congress, Nana Patole, Devendra Fadnavis, Maharashtra

मुंबई, २४ मार्च: फोन टॅपिंग प्रकरणावरुन भाजपकडून राज्य सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेत फोन टॅपिंगसह राज्यात सुरू असलेल्या इनतर प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. यानंतर पत्रकार परिषदेत फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. तसेच काँग्रेसला या प्रकरणांमध्ये किती हिस्सा मिळतोय असा सवाल त्यांनी केला होता. आता त्यांच्या या सवालाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

फडणवीस स्वत: न्यायाधीश झाले होते. त्यांच्या मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर ते क्लीन चीट द्यायचे. त्यावेळी का राजीनामा घेतले नाही? राजकारणात आरोप होत असतात पण सत्यता समोर येईपर्यंत राजीनामा घेणं चुकीचं आहे. दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच काँग्रेसची भूमिका आहे. आरोप केल्यानंतर परमबीर सिंग यांच्यासाठी चांगले झाले,” अशी टीका नाना पटोले यांनी केली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह दोषी आहेत की अनिल देशमुख हे तपासावं लागलं. देवेंद्र फडणवीसांप्रमाणे उद्धव ठाकरे न्यायाधीश नाहीत. फडणवीस मुख्यमंत्री असताना न्यायाधीशाची भूमिका निभावत होते,” अशी टीका नाना पटोले यांनी केली.

आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं आहे. वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिलं आहे. आरएसएसला कसा वाटा पुरवला गेला होता, आरएसएसची लोकं कशी प्रत्येक मंत्रालयात होती, फडणवीसांच्या मंत्रालयात आरएसएसची किती लोकं होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत, असे नाना पटोले म्हणाले.

 

News English Summary: The BJP has been consistently targeting the state government over phone tapping. Meanwhile, Leader of the Opposition Devendra Fadnavis today called on Governor Koshyari and demanded his intervention in other ongoing cases in the state, including phone tapping. After this, in the press conference, Fadnavis had strongly targeted the Congress. He also questioned the Congress’ share in these cases. Now, Congress state president Nana Patole has given a strong answer to his question.

News English Title: Congress state president Nana Patole slams Devendra Fadnavis over current political crisis in Maharashtra news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NanaPatole(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या