5 May 2024 6:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

BREAKING | राष्ट्रीय आणीबाणीसारखी परिस्थिती, सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

India corona pandemic

नवी दिल्ली, २२ एप्रिल: देशभरात कोरोना संसर्गाच्या उद्रेकामुळे सर्वोच्च न्यायालयाने आता स्वत:हून दखल घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला कोरोना परिस्थितीवरुन फटकारलं आहे. कोर्टाने केंद्राला नोटीस पाठवून कोव्हिडबाबत ‘नॅशनल प्लॅन’ काय? अशी विचारणा केली आहे.

सुप्रीम कोर्टाने चार मुद्द्यांवरुन सरकारकडून उत्तर मागितलं आहे. यामध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती, आवश्यक औषधांचा पुरवठा, लसीकरण आणि लॉकडाऊन घोषित करण्याचे अधिकार राज्य सरकारांना हवे यांचा समावेश आहे. महाधिवक्ता तुषार मेहता यांनी देशाला ऑक्सिजनची अत्यंत आवस्यकता असल्याचं कोर्टात सांगितलं. कोर्टाने ऑक्सिजन तुटवडा आणि आवश्यक संसाधनांवरुन स्वत: दखल घेतली आहे. याप्रकरणी आता सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्या कक्षात उद्या सुनावणी होणार आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने करोनाच्या तयारीसंबंधी सध्या सहा राज्यांमधील उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असल्याची दखल घेतली. दिल्ली, मुंबई, सिक्कीम, मध्य प्रदेश, कोलकाता आणि अलाहाबाद या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. “ते चांगल्या हितासाठी कार्यक्षेत्र वापरत आहेत. परंतु यामुळे संभ्रम निर्माण होत आहे,” असं सरन्यायाधीशांनी म्हटलं.

सुप्रीम कोर्टाने चार मुद्द्यांवर केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा, महत्वाच्या औषधांचा पुरवठा, लसीकरणाची पद्धत आणि लॉकडाउन जाहीर करण्याचा अधिकार यासंबंधी सुप्रीम कोर्टाने केंद्राला विचारणा केली आहे. दरम्यान हरिश साळवे यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

News English Summary: The Supreme Court has now taken cognizance of the outbreak of corona infection across the country. The Supreme Court has slammed the central government over the Corona situation. What is the ‘National Plan’ for Covid after the court sent a notice to the Center? That is the question.

News English Title: The Supreme Court has slammed the central government over the Corona situation news updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x