7 May 2025 2:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

घाबरुन थेट रुग्णालयांमध्ये जाऊन गर्दी करण्याची गरज नाही | अनेक रुग्ण घरीच बरे होऊ शकतात - केंद्रीय आरोग्यमंत्री

India corona pandemic

नवी दिल्ली, २९ एप्रिल | जगातील कित्येक देशांमध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, जगात गेल्या चोवीस तासांत 8 लाख 85 हजार 604 नवीन रुग्ण आढळले असून यामध्ये 15 हजार 284 लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील 17 देशांमध्ये भारतीय विषाणूचा स्ट्रेन आढळून आला असल्याचे म्हटले आहे. डब्ल्यूएचओने याला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ (VOI) घोषित केले असून B.1.617 या डबल म्यूटेंट व्हेरिएंटमुळेच भारतात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत असल्याचा दावा केला आहे.

तर भारताबाबत चिंताजनक वृत्त म्हणजे बुधवारी 3 लाख 79 हजार 164 नवीन रुग्ण समोर आले आहेत. आतापर्यंत एका दिवसात आढळलेल्या नवीन रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 27 एप्रिलला सर्वात जास्त 3.62 लाख रुग्ण समोर आले होते. या व्यतिरिक्त 24 तासांच्या आत 3,646 संक्रमितांचा मृत्यूही झाला आहे. हा सलग दुसरा दिवस होता जेव्हा तीन हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मंगलवारी 3,286 मृत्यूंची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आरोग्यमंत्र्यांनी लोकांनी घाबरुन जाण्याचं कारण नसल्याचं सांगत घरी बसूनही अनेकजण बरे झाल्याचं म्हटलं आहे. ऑक्सिजन पुरवठा केला जात असला तरी ऑक्सिनसंदर्भातील योग्य माहिती असणंही गरजेचं आहे असंही आरोग्यमंत्री म्हणाले आहेत. घाबरुन थेट रुग्णालयांमध्ये जाऊन गर्दी करण्याची गरज नाही. ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांना तो मिळालाच पाहिजे. मात्र पुरेशी माहिती नसल्याने एखाद्याने ऑक्सिजन मिळालाच पाहिजे असं म्हणणं किंवा वाटणं चुकीचं आहे, असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

“घाबरुन उगाच इकडे तिकडे पळापळ करु नका. बहुतांश रुग्ण हे डॉक्टरांच्या संपर्कात राहून घरीच बरे होऊ शकतात. मी हे केवळ आरोग्यमंत्री म्हणून नाही तर एक डॉक्टर म्हणून ही सांगत आहे,” असंही हर्ष वर्धन म्हणाले आहेत.

लसींच्या तुटवड्यासंदर्भातही हर्ष वर्धन यांनी भाष्य केलं असून राज्यांच्या कामगिरीप्रमाणे त्यांना लसी पुरवण्यात आल्याची माहिती दिली आहे. “लसीकरणामध्ये राज्यांनी केलेल्या कामगिरीच्या आधारे आम्ही लसींचा पुरवठा केलाय. आम्ही राज्यांना १६ कोटी लसींचे डोस दिलेत. त्यापैकी १५ कोटी लसी देण्यात आल्या आहेत,” असं आरोग्यमंत्री म्हणाले.

 

News English Summary: Right info regarding oxygen is also very crucial. There’s no need to rush to hospitals as a result of panic reactions. Those who need oxygen should get it but it’s not right if someone thinks he needs oxygen, due to lack of knowledge said union Health Minister.

News English Title: There is no need to rush to hospitals as a result of panic reactions said union health minister news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या