4 May 2025 3:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

पोलखोल | फडणवीसांकडून दिशाभूल करणारी माहिती | घटना तज्ज्ञांनी सांगितल्या फडणवीस सरकारच्या 'त्या' चुका

Senior constitution Ulhas Bapat

मुंबई, ५ मे | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर यावर भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणाचा निकाल दुखदायी आणि अत्यंत निराशाजनक आहे. मुळातच आपण मराठा आरक्षणाचा कायदा केल्यानंतर या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका झाली. त्यावर हायकोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिला. आपला कायदा वैध ठरवला. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल झाली. तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. तेव्हा आपण सर्वोच्च न्यायालयात मजबुतीने बाजू मांडली.

पुढे फडणवीस म्हणाले की, आज याचिकाकर्त्यांनी जे मुद्दे मांडले, त्यावेळी तेच मुद्दे मांडले होते. तेव्हा तत्कालीन सरन्यायाधीशांसमोर सुनावणी झाली. आपण तेव्हा प्रभावी युक्तिवाद केला. त्यामुळे सरन्यायाधीशांनी आपला कायदा सुरूच राहिल, असं तेव्हा सरन्यायाधीशांनी सांगितलं. मात्र, नवीन बेंच तयार केलं. तेव्हा सरकारने बाबी मांडताना समन्वयाचा अभाव होता. वकिलांना माहिती नव्हती, त्यांना सूचना दिलेल्या नव्हत्या. त्यामुळे केस अॅडजर्न करावी लागली. या समन्वयाच्या अभवामुळेच कायद्याला स्थिगिती मिळाली, असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, फडणवीस यांनी प्रत्यक्ष निकालाची प्रत आणि प्रत्यक्ष संविधानातील लहान मोठे तसेच न्यायिक बारकावे याबद्दल कोणतीही माहिती नसताना एखाद्या तज्ञाप्रमाणे विषय मांडण्याचा प्रयन्त केला जसा ते दरवेळी आव आणतात. ते काय बोलत आहेत हे राज्यातील बऱ्याच लोकांना कळणार देखील नाही याची देखील त्यांना खात्री असते आणि त्यामुळे एखादं खोटं देखील ते सुरेख प्रकारे मांडतात, ज्यामध्ये माध्यमं देखील फसतात हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यासाठी प्रसार माध्यमांनी घटना तज्ज्ञांच्या अभ्यासातून सदर विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि फडणवीस संपूर्ण राज्याची आणि मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचं समोर आलं आहे.

यासंदर्भात ज्येष्ठ घटनातज्ञ प्रा. उल्हास बापट यांच्याकडून या निकालाबद्दल आणि फडणवीसांच्या टिपणी बद्दल वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते सविस्तर बोलताना सांगितलेले मुद्दे असे;

1)  “मी यापूर्वी देखील अनेकदा स्पष्ट केलं आहे की पन्नास टक्क्यांची वर आरक्षण शक्य नाही. घटनेचा अंतिम अर्थ लावायची जबाबदारी सुप्रीम कोर्टाची असते. कोणी चूक केली तर सर्वोच्च न्यायालय ती दुरुस्त करत असतं. हेच आज न्यायालयाने सिद्ध केलं.

2) तसेच अपवाद हा घटनेपेक्षा मोठा असू शकतं नाही. इंदिरा सहानी केस मध्ये ५०टक्क्यांवर आरक्षण देता येत नाही हे स्पष्ट सांगितलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतिम असतो आणि तो हाय कोर्टवर बांधील देखील असतो. तरी देखील हाय कोर्टाने हा कायदा मंजूर कसा केला हा प्रश्न होता.

3) मागासवर्गीय आयोगाचा अहवाल फडणवीस सरकारने विधानसभे समोर ठेवलाच नाही. त्यात दोन सदस्यांचे मतभेद होते. तरी त्यांनी सभागृहात हा अहवाल न मांडता आरक्षण जाहीर केलं गेलं आणि उद्धव सरकार ने तेच कायम ठेवलं. जे आधीचे वकील होते तेच आत्ताचे वकील होते. या सगळ्यांचा जो बेस होता तो गायकवाड आयोगाचा अहवालच सुप्रीम कोर्टाने मान्य केलेला नाहीये. मुळात ५० टक्क्यांचा वर आरक्षण देणं हीच चूक दोन्ही सरकार ने केली आहे. अगदी फडणवीस सरकार पासून. त्यामुळे बाजू मांडायला कमी पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुद्दे तेच होते.

4) तामिळनाडू मध्ये जास्त आरक्षण चालतं मग महाराष्ट्रातल्या कायद्याला नेमकी काय अडचण आहे यावर बापट म्हणाले की ? कसं आहे की जिथे जिथे ५० टक्क्यांवर आरक्षण दिलं गेलं तिथे तिथे हायकोर्टानं स्टे दिलेला आहे. मुंबई हायकोर्टाने स्टे दिला नव्हता, ते प्रकरण मग सुप्रीम कोर्टाकडे गेलं. कुठल्याही राज्यामध्ये ५० टक्क्यांहून जास्त आरक्षण नाही.

5) देवेंद्र फडणवीस जे बोलत होते ती माहिती काहीशी दिशाभूल करणारी आहे. एक दोन टक्क्यांचा अपवाद हा केलेला आहे त्यात अंध लोकांना वगैरे आरक्षण आहे. बाकी ५० टक्क्यांवर आरक्षण नाही. ते फक्त तामिळनाडू मध्ये आहे कारण तामिळनाडूचा कायदा हा त्यावेळी नवव्या परिशिष्टात टाकला होता. आणि त्यात टाकला तर त्याला चॅलेंज करता येत नाही. पण त्याला घटना दुरुस्ती करावी लागते. ती १९९४ मध्ये झाली होती. म्हणून ते ६९ टक्के आहे. इतर कोणत्याही राज्यात ९ व्या परिशिष्टात कायदा टाकलेला नाही. ५० टक्क्यांचा वर आरक्षण देता येत नाही.

 

News English Summary: The information that Devendra Fadnavis was talking about is somewhat misleading. The exception of one or two per cent is reserved for the blind. There is no reservation on the remaining 50 per cent. It is only in Tamil Nadu as the law of Tamil Nadu was included in the Ninth Schedule at that time said Senior constitution expert Ulhas Bapat.

News English Title: Senior constitution expert Ulhas Bapat clarification over Fadnavis statement regarding Maratha Reservation news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या