3 May 2025 9:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

प. बंगालमध्ये भाजप टेन्शनमध्ये | ममता बॅनर्जी मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत

CM Mamata Banerjee

कोलकत्ता, ०९ जून | विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल या आशेनं तृणमूलच्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला. मात्र भारतीय जनता पक्षाला शंभरीदेखील गाठता आली नाही. तर तृणमूलनं २०० हून अधिक जागा मिळवल्या. पुढील पाच वर्ष विरोधात राहून संघर्ष करणं अतिशय कठीण असल्याची कल्पना संबंधित दलबदलूंना आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वजन प्रचंड वाढल्याने त्या आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधकांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवार असतील याची चर्चा देशासहित पश्चिम बंगालमध्ये जोर धरू लागली आहे. तसे झाल्यास भाजपकडून खासदार पदी निवडून येणं कठीण असेल याचे संकेत भाजपच्या विद्यमान खासदारांनांही मिळाले आहेत. त्यात ममता विरोधकांना किती कडवी टक्कर देतात, त्यांचे डावपेच कसे हाणून पाडतात, हे या नेत्यांना माहीत आहे. त्यामुळेच घरवापसीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जवळपास ३० आमदार लवकरच तृणमूलमध्ये प्रवेश करू शकतात.

तृणमूलला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या नेत्यांना आपल्या सोबत कायम ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. अनेक नेते तृणमूलमध्ये जाण्याच्या तयारीत असल्यानं काल भाजप प्रदेश कार्यालयात नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या उच्चस्तरीय संघटनात्मत बैठकीला काही मोठे नेते अनुपस्थित होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता न आल्यानं बरेसचे नेते पक्ष सोडण्याच्या विचारात आहे. त्यामुळे लवकरच बंगालच्या राजकारणात भूकंप होऊ शकतो.

 

News English Summary: Trinamool leaders slammed the Bharatiya Janata Party (BJP) government in West Bengal after the Assembly elections. But the Bharatiya Janata Party could not reach even a hundred. Trinamool won more than 200 seats. Concerns have been raised that the next five years will be very difficult to fight.

News English Title: Many BJP MLAs may join TMC party soon in West Bengal news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या