30 April 2024 9:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ | युपी भाजपच्या सोशल मीडिया पेजवरून मोदींचा फोटो हटवला

Uttar Pradesh Assembly Election 2022

लखनऊ, ०९ जून | पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. ही निवडणूक जिंकून सत्ता कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीची तयारी आतापासूनच करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशासह ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठीची तयारी भाजपनं सुरू केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंदेखील लक्ष घातलं आहे. विशेष म्हणजे आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या पाश्वभूमीवर उत्तर प्रदेश भाजपच्या ट्विटर पेजवरून मोदींचा फोटो हटवला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपच्या इतर राज्यांच्या सोशल मीडिया पेजवर मोदींचा फोटो असल्याचं स्पष्ट झालं आहे.

उत्तर प्रदेशची निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली लढवण्याचा निर्णय दिल्लीत झालेल्या संघाच्या बैठकीत झाला आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशसोबत निवडणूक होत असलेल्या इतर राज्यांमध्येही भाजप मोदींचा चेहरा वापरला जाणार नाही. प्रादेशिक नेत्यांच्या विरोधात पंतप्रधान मोदींचा चेहरा पुढे केल्यानं त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचं संघाला वाटतं. राज्याच्या निवडणुकीत प्रादेशिक नेते वि. मोदी असं चित्र उभं केल्यानं विरोधकांकडून मोदींना विनाकारण लक्ष्य केलं जातं असं निरीक्षण बैठकीत नोंदवण्यात आलं.

दिल्लीत पार पडलेल्या संघाच्या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या उपस्थितीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सुत्रांच्या माहितीनुसार, संघाला मोदींच्या प्रतिमेची काळजी आहे. त्यामुळेच राज्यांच्या निवडणुका मोदींच्या चेहऱ्यावर लढवल्या जाऊ नयेत असं संघाला वाटतं. संघाच्या बैठकीत पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवाबद्दल चिंतन करण्यात आलं. बंगालमध्ये पंतप्रधान मोदी वि. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशी रणनीती आखल्यानं नुकसान झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

 

News English Summary: Assembly elections are being held in 5 states including Uttar Pradesh. BJP has started preparations for this election. What is special is that the Rashtriya Swayamsevak Sangh has also paid attention to this. In particular, on the backdrop of the upcoming Uttar Pradesh Assembly elections 2022, a photo of Modi has been deleted from the Twitter page of the Uttar Pradesh BJP. Secondly, it has become clear that there is a photo of Modi on the social media pages of other BJP states.

News English Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 PM Narendra Modi photo removed from Uttar Pradesh BJP Social Media pages news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x