4 May 2025 10:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

Health First | आपलं शरीर अशा निरनिराळ्या प्रतिक्रिया का देत असतं? कारणे जाणून घ्या

Reason behind physicals reaction

मुंबई, १२ जून | कधी थंडीमुळे शहारे येणं तर कधी शिंक येणं, कधी खाज येणं कधी थकवा येणं कधी कंटाळा येणं या सर्व प्रतिक्रिया सर्वांसह होतात. परंतु आपल्याला हे माहिती आहे का की आपले शरीर अशी प्रतिक्रिया का देत ? चला तर मग जाणून घेऊ या.

शहारे येणं:
आपल्याला थंडी किंवा भीती वाटत असल्यास शहारे येणं ही सामान्य बाब आहे. आपल्या त्वचावरील केस एक मऊ उबदार आवरण बनवतात. या मुळे त्वचेवर त्याचा प्रभाव पडत नाही.

खाज येणं:
एखाद्या कीटक किंवा डास चावल्यावर शरीरात खाज होते. आपले शरीर त्वचा आणि मेंदू ला संकेत देतात की काही तरी चुकीचे घडत आहे ते थांबविणे आवश्यक आहे. याची प्रतिक्रिया आपण खाजवून देतो.

घाम येणं:
धावल्यावर, उन्हात असताना, पोहताना, व्यायाम करताना घाम येतो .घाम येणं हे संकेत देत की शरीरातील तापमान वाढले आहे. तापमानाला थंड करण्याची गरज आहे. घाम निघाल्यावर आपल्याला थंड जाणवतं.

जांभाळी येणं:
हे आळस पणा चे सूचक आहे ही एक प्रतिक्रिया आहे जे आपल्या शरीराला सचेत करते की सावध राहायचे आहे. जांभाळी घेतल्यावर शरीरात कार्बन डाय ऑक्साईड आणि ऑक्सिजनची देवाण घेवाण होते. आपण अतिरिक्त ऑक्सिजन घेऊन कार्बन डाय ऑक्साईड सोडता जे आपल्याला जागृत ठेवते.

शिंका येणं:
जर आपल्याला सतत शिंका येत असतील, तर याचा अर्थ आहे की आपल्या नाकात काही तरी अवांछित आहे जे हानिकारक आहे ते बाहेर काढण्यासाठी मेंदू संकेत देत जर आपल्याला सर्दी असेल तर नाकात जमा होणार श्लेष्मा जंतूंना आत प्रवेश करण्यास प्रतिबंधित करतो.

रडणे:
रडल्यामुळे डोळे स्वच्छ होतात आणि दृष्टी वाढते.जेव्हा आपण अत्यंत संवेदनशील असतो आणि आपली अस्वस्थता व्यक्त करण्यास अक्षम असतो तेव्हा आपण रडतो. ही प्रक्रिया एखाद्या समस्येकडे निर्देशित करते या व्यतिरिक्त जास्त तणाव आल्यावर रडल्याने तणाव मुक्त होण्यास मदत मिळते.

लाजणे:
लाज ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. याचा अर्थ असा की आपले रक्त परिसंचरण वाढत आहे आणि पुरेसा ऑक्सिजन शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचत आहे. या व्यतिरिक्त,एड्रि‍नेलिन हार्मोन बाहेर पडताना हृदयाची धडधड वाढते तेव्हासुद्धा लालसरपणा आणि लाज यासारख्या संवेदना चेहर्‍यावर दिसतात.

 

News Title: Reason behind physicals reaction of body health news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या