1 November 2024 5:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 3 शेअर्स खरेदी करा, स्टॉक खरेदीला गर्दी, रोज 20% अप्पर सर्किट हिट PPF Investment | PPF मधील महिना बचत मॅच्युरिटीला देईल 41 लाख रुपये परतावा, असा मिळाला मोठा फायदा - Marathi News Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा शेअर तेजीने परतावा देणार, स्टॉक खरेदीला गर्दी, मजबूत कमाई होणार - NSE: PATELENG
x

महाराष्ट्रात मीडिया अजून शिल्लक आहे | त्यांच्या माध्यमातून काय गौप्यस्फोट करायचे आहेत ते करा - शरद पवार

NCP President Sharad Pawar

मुंबई, २६ जून | महाराष्ट्राच्या २ दिवसीय पावसाळी अधिवेशनावर विरोधीपक्ष असलेला भाजप तीव्र नाराज आहे. भाजपच्या नेत्यांकडून सरकारवर या मुद्द्यांवरून जोरदार टीका होत आहे. “मी गौप्यस्फोट करणार हे या सरकारला ठाऊक आहे म्हणून हे सरकार पळ काढत आहे”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपाला आता थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर शरद पवारांनी यावेळी फडणवीसांना एक सल्लाही दिला आहे.

पुण्यात बोलताना आज (२५ जून) शरद पवार म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांना जे काही गौप्यस्फोट करायचे आहेत ते खुशाल करावेत. महाराष्ट्रात मीडिया अजून शिल्लक आहे. त्यांच्या माध्यमातून काय गौप्यस्फोट करायचे आहेत ते करा. पण या कारणासाठी राज्याला वेठीला धरू नका. राज्यात कोरोनास्थिती आहे. म्हणूनच अधिवेशनाचा कालावधी कमी करावा लागतो आहे. केंद्राने देखील संसदेच्या अधिवेशनाबाबत हेच केले. लक्षात घ्या”, असे शरद पवार देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले.

तसेच ओबीसी आरक्षणासाठी भाजपने चक्काजामची हाक दिली आहे. याविषयी बोलताना टोला लगावत शरद पवार म्हणाले की, “पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सांगत आहेत की आंदोलन करू नका, आंदोलनांपासून लांब राहा आणि राज्यातले त्यांचेच भक्त आता आंदोलन करणार आहेत.”

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: NCP President Sharad Pawar reply to Devendra Fadnavis over his stand on assembly session news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x