1 November 2024 6:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 3 शेअर्स खरेदी करा, स्टॉक खरेदीला गर्दी, रोज 20% अप्पर सर्किट हिट PPF Investment | PPF मधील महिना बचत मॅच्युरिटीला देईल 41 लाख रुपये परतावा, असा मिळाला मोठा फायदा - Marathi News Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा शेअर तेजीने परतावा देणार, स्टॉक खरेदीला गर्दी, मजबूत कमाई होणार - NSE: PATELENG
x

‘फडणवीस’ हे मुळात आडनाव नाही | ते मूळचं पर्शियन नाव आहे ‘फर्द नलीस’ - राज ठाकरे

Raj Thackeray

मुंबई, २९ जुलै | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज वाढदिवस आहे. ते यावर्षी 100 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्त आज पुण्यात सेलिब्रेशन केले जात आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी स्वतः उपस्थिती लावली. त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे अभिचिंतन करत सत्कार केला आहे.

बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसा निमित्त पुण्यात 20 बाय 15 फूटी रांगोळी साकारण्यात आली आहे. यासोबतच 99 दिवे प्रज्वलित देखील करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि इतिहास प्रेमी मंडळामार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली तसेच मनसे परिवाराच्या वतीने चिरतरुण शिवशाहिरांना मनःपूर्वक शुभेच्छा असेही म्हटले आहे.

यावेळी राज यांनी मीडियाशी संवाद साधताना बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत झालेल्या भेटींमधील किश्यांना उजाळा दिला. यावेळी राज यांनी थेट ‘फडणवीस’ हे आडनाव कुठून आलं? हे आडनाव कसं पडलं? याचा इतिहासच ऐकवला.

आपल्याकडे अनेक शब्द आहेत ते फारसी आहेत. पण ते आपल्याला माहीत नाहीत. अनेक आडनावं कशावरून आली हे माहीत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर हे ‘फडणवीस’ हे मुळात अडनाव नाही. ते मूळचं पर्शियन नाव आहे ‘फर्द नलीस’. ‘फर्द’ म्हणजे कागद, ‘नलीस’ म्हणजे लिहिणारा. म्हणजे ‘फर्द नलीस’. नंतर ते फडावर लिहिणं आलं. म्हणून ते फडणवीस आलं, असं राज यांनी सांगितलं. आडनावं कशी असतात? आडनाव कशी पडली? ती कुठून आली? यात मला रस आहे. हे कुठून आले? कसे आले? महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ कुठून आले? कसे आले? चपाती, पोळी कुठून आले? महाराष्ट्रात गहू नव्हता. मग गहू आला कुठून? अशा अनेक गोष्टी असतात त्या भूगोल आणि इतिहासाशी संबंधित असतात. बाबासाहेब या विषयावर माझ्याशी बोलले त्याबद्दल मी मला भाग्यवंत समजतो, असंही ते म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MNS Chief Raj Thackeray told story of roots of Fadnavis surname news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x