नवी दिल्ली, ०९ ऑगस्ट | मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सोमवारी लोकसभेत दिली. एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात मेघवाल यांनी संसदेत ही माहिती दिली.

प्रस्तावावर सकारात्मक विचार:
भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी विचारलेल्या पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत ही माहिती दिली. या विषयावर विचार करण्यासाठी एका आठ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मराठीलाही अभिजात दर्जा देण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. सरकार या दृष्टीने सकारात्मक पद्धतीने पुढे जात आहे असे मेघवाल प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान म्हणाले. तत्पूर्वी यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पंतप्रधानकडे लेखी मागणी केली होती आणि शिवसेनेच्या खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत ही मागणी करताना संसदेच्या आवारात प्रदर्शन देखील केलं होतं.

अभिजात दर्जासाठीचे निकष:
एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी त्या भाषेला दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असणे आवश्यक आहे. प्राचीन साहित्यिक नोंदींसह त्या भाषेचे साहित्य हे मूळ असावे आणि दुसऱ्या भाषेतून घेतलेले नसावे असे निकष सरकारने ठरविलेले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Classical language status to Marathi language topic in Loksabha news updates.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावर केंद्राचा विचार सुरू | लोकसभेत माहिती, समितीचीही स्थापना