1 May 2025 5:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT
x

Health First | स्पाँडिलिसिस आजाराची कारणे, लक्षणे आणि उपचार - नक्की वाचा

Spondylosis symptoms in Marathi

मुंबई, १६ ऑगस्ट | पूर्वी वृद्धावस्थेतील आजार म्हणून ओळखले जाणारे आजार हल्लीच्या जीवनशैलीमुळे तरुणपणीच उद्भवत आहेत. मानदुखी किंवा सर्व्हायकल स्पाँडिलिसिस हा त्यापैकीच एक.सर्व्हायकल स्पाँडिलिसिस या आजारात मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी येते. मानेत एकूण सात मणके असतात. त्यांच्या साह्यानेच आपण मानेच्या हालचाली करू शकतो. या मणक्यांची झीज झाल्याने सर्व्हायकल स्पाँडिलिसिस उद्भवतो. यात मणक्यांतील अंतर कमी होणे, गादी झिजणे, मणका जागेवरून सरकणे (स्पाँडिलिस्थेसिस). नस दबली जाणे (नर्व्ह क्रॉम्प्रेशन) असे आजार यात होऊ शकतात.

स्पॉन्डिलायसिस हा आजार मुख्य करून पाठीच्या कण्याचे हाड ,कार्टिलेज,डिस्क वर परिणाम करतो . याचा परिणाम मान आणि कंबर म्हणजेच कण्याच्या खालच्या बाजूला होतो.

काही प्रमुख कारणे आणि लक्षणे जाणून घेऊया जी त्याच्या विविध प्रकारावर अवलंबून असतात .
* लंबर स्पॉन्डिलायसिस मध्ये कडकपणा आणि पाठीत वेदना होणे
* जास्त वेळ बसून राहिल्यास पाठ दुखणे
* डोक्याच्या मागील बाजूस डोकेदुखी होणे
* हातापायांमध्ये अशक्तपणा जाणवणे
* खांद्यापर्यंत मानेच्या वेदना होणे इत्यादी.

याची प्रमुख कारणे आहे जसे की वय वाढणे, मानेची इजा, गंभीर संधिवात इत्यादी आहे. याचे निदान आणि उपचार पुढील निकषांनुसार केले जाते. पाठ आणि मानेच्या लवचिकतेची तपासणी केली जाते, चालण्याच्या क्रियेचे मूल्यांकन केले जाते,गरज वाटल्यास एक्स रे देखील काढला जातो, यावर उपचार करण्यासाठी ओव्हर द काउंटर औषोधोपचार दिले जातात. फिजिकल थेरपी तसेच गंभीर अवस्थेत इंजेकशन आणि औषधे दिली जातात.

काय काळजी घ्यावी?
* काम करताना, गाडी चालवताना कणा ताठ राहील अशा पद्धतीने बसावे.
* डोक्याखाली जाड उशी घेऊ नये, अधिक प्रवास, ओझे उचलणे टाळावे.
* कॉम्प्युटरवर काम करणाऱ्यांनी ठरावीक वेळेनंतर मानेच्या हालचाली कराव्यात.
* आहारात कॅल्शियम व फॉलकि अ‍ॅसिडयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

आयुर्वेदकि पंचकर्म उपचार:
नस्य:
नाकात विशिष्ट पद्धतीने औषधी द्रव्य सोडण्याची पद्धत. अनेक रुग्णांवर अनुभवलेले संशोधित मन्यास्तंभ तेल नाकात योग्य पद्धतीने सोडल्यास रुग्णांना फायदा होतो. त्यामुळे मानदुखीच्या सर्व रुग्णांनी नस्यकर्म करावे.

औषधोपचार:
मणक्यांची झीज भरून काढण्यासाठी आयुर्वेदात प्रभावी औषधी आहेत. घेण्यास सहज व सोपी असल्याने ती सर्व वयोगटातील रुग्णांना लाभदायक ठरतात. विशिष्ट औषधींनी सिद्ध तेल जेवणापूर्वी घेतल्यास वेदना, मुंग्या येणे, चक्कर येणे ही लक्षणे कमी होतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Title: Spondylosis symptoms in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या