12 May 2025 12:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | धमाल होणार गुंतवणूकदारांची, टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | अक्षरशः तुटून पडले गुंतवणूकदार, आज शेअर 8.93 टक्क्यांनी वाढली, फायद्याची अपडेट - NSE: RVNL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर तुटून पडले गुंतवणूकदार; पुढे मिळणार जरबदस्त परतावा - NSE: SUZLON IRFC Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार; मल्टिबॅगर शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IRFC IREDA Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत, खरेदी करून ठेवा हा शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IREDA Vedanta Share Price | मायनिंग कंपनी स्टॉक खरेदीला गर्दी, BUY रेटिंग जाहीर, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL Vikas Lifecare Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलवर आला, पुढे काय होणार? अपडेट आली - NSE: VIKASLIFE
x

VIDEO | क्रूर तालिबानी महिलांना पळवून नेत आहेत | तर विमानतळावर जाणाऱ्या नागरिकांवर थेट गोळीबार

Taliban in Afghanistan

काबुल, १८ ऑगस्ट | तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यामुळे भारतात राहणाऱ्या शेकडो अफगाणी नागरिकांची काळजी वाढली आहे. चंदीगडमध्ये वास्तव्यास असलेल्या काही अफगाणी नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. तालिबानी महिलांना घरातून पळवून नेत आहेत. महिलांच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला आहे, अशा प्रतिक्रिया अनेकांनी नोंदविल्या. विमानांत माणसं कोंबून स्थलांतर करत असल्याची भयंकर परिस्थिती अफगाणिस्तानात निर्माण झाली आहे. याच दरम्यान आता पुन्हा एकदा तालिबानचा क्रूर चेहरा समोर आला आहे.

काबुल विमानतळावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकावर तालिबान्यांनी थेट गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. अश्वका न्यूजने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत एक नागरिक विमानतळाच्या भिंतीवर चढून विमानतळावर जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी खालून काळ्या कपड्यातील एक बंदुकधारी या नागरिकाच्या दिशेने गोळी झाडतो. यानंतर तो नागरिक गोळी लागल्याने भिंतीवरुन खाली पडतो असं व्हिडिओमध्ये दिसतंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Taliban Fighter shooting on a man trying to enter in Kabul Airport news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या