11 November 2024 1:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पुन्हा मालामाल करणार, यापूर्वी 381% परतावा दिला - NSE: VEDANTA Suzlon Share Price | 2200% परतावा देणारा मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 61 रुपयांवर आला, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: Suzlon NBCC Share Price | एनबीसीसी शेअर 100 रुपयांच्या खाली घसरला, आता तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC BHEL Share Price | PSU शेअर पुन्हा तेजीत येणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा- NSE: BHEL GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 5 पेनी शेअर्स फोकसमध्ये, तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड 61 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO RVNL Share Price | उच्चांकापासून 30% घसरलेला RVNL शेअर पुन्हा रॉकेट होणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

तालिबानची पहिली पत्रकार परिषद | महिलांबाबत महत्वाचं वक्तव्य - काय म्हणाले?

Taliban in Afghanistan

काबुल, १८ ऑगस्ट | तालिबानने काबुलवर ताबा मिळवल्यावर त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी काबुल मध्ये कोणते नवीन नियम लागू करणार या बाबत माहिती दिली आहे. पहिल्या अधिकृत पत्रकार परिषदेत इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे वचन दिले. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले की, महिलांच्या हक्कांचे संरक्षण इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत केले जातील. महिलांनीही सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी देशातील लोकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी ही घोषणा केली होती.

तालिबानच्या पहिली पत्रकार परिषद:
तालिबान्यांनी त्यांची पहिली पत्रकार परिषद घेतली आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची महिलांच्या बाबतीत असलेल्या चिंतेबाबत आपली भूमिका मांडली. तालिबानने मंगळवारी इस्लामिक कायद्यांतर्गत महिलांच्या हक्कांचा आदर करण्याचे वचन दिले आणि त्यांना विरोध करणाऱ्यांना माफी जाहीर केली आहे. तालिबानने अफगाणिस्तान सुरक्षित करण्याचे आश्वासन दिले आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद म्हणाले की, संघटनेची सैनिकांना कोणाचाही सूड घ्यायचा नाही आणि सर्वांना माफ करण्यात आले आहे.

अफगाणिस्तान सुरक्षित करू:
तालिबानने पत्रकार परिषद घेऊन नवीन नियमांबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी वचन दिले की तालिबान अफगाणिस्तान सुरक्षित करतील. त्यांनी असेही म्हटले की ज्या लोकांनी मागील सरकारसोबत किंवा परदेशी सरकार किंवा सैन्याबरोबर काम केले त्यांच्यावर कोणताही सूड उगवायचा नाही. आम्हाला इतर देशांशी शांततापूर्ण संबंध हवे आहेत.

त्याच्या पहिल्या पत्रकार परिषदेत, तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले: ‘आम्ही खात्री देतो की कोणीही त्यांच्या दारात जाऊन त्यांनी मदत का केली हे विचारणार नाही.’ त्याआधी तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य इमानुल्ला सामंगानी यांनी महिलांना सरकारमध्ये सामील होण्यास प्रोत्साहित करेल असे वचन दिले होते.

परदेशी नागरिकांना कोणताच त्रास होणार नाही:
तालिबानच्या दहशतीमुळे काबुल मधले परदेशी नागरिक घाबरून गेले आहेत. तालिबानने या नागरिकांना न घाबरणाच्या सल्ला दिला आहे व तुम्हाला काही करणार नाही असं आश्वासन देखील दिलं आहे. महिलांना इस्लामिक कायद्यानुसार अधिकार दिले जातील, असे सांगून मुजाहिद यांनी अनेक अफगाणिस्तान आणि परदेशी नागरिकांच्या प्रमुख चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Taliban first press conference after takeover of Afghanistan news updates.

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x