19 May 2024 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा
x

Alert | गेल्या 24 तासात आढळले 35,197 नवीन प्रकरणे | एका दिवसात 10 हजारने वाढ

Corona Pandemic

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट | देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणांत दिवसेंदिवस चढउतार होत आहे. मंगळवारी यामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. देशात गेल्या 24 तासात 35 हजार 197 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे सोमवारी देशात 24 हजार 692 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. दरम्यान, एका दिवसात 37 हजार 136 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 440 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

यासोबतच सक्रिय रुग्णांतदेखील घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत एका दिवसात 2 हजार 398 ने घट झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात सलग चौथ्या दिवशीही सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाली आहे. देशात सध्या 3.61 लाख लोकांवर उपचार सुरु आहे.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये:
* गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस आल्या : 35,197
* गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले : 37,136
* गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 440
* आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 3.22 कोटी
* आतापर्यंत बरे झाले : 3.14 कोटी
* आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.32 लाख
* सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 3.61 लाख

चाचण्या आणि लसीकरण:
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १७ ऑगस्टपर्यंत देशभरात ५६ कोटी ६ लाख करोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी ५५.०५ लाख लसी देण्यात आल्या. त्याचबरोबर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) नुसार, आतापर्यंत ४९ कोटी ८४ लाख करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी सुमारे १७.९७ लाख करोना चाचण्या करण्यात आल्या, ज्यांचा सकारात्मकता दर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Covid 19 in India Coronavirus Deaths Active Cases Vaccinations news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x