3 May 2025 9:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

भूपेंद्र पटेल यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येताच उपमुख्यमंत्री नितीन पटेलांची बंडाची भाषा? | भाजपमध्ये धाकधूक

Gujarat DCM Nitin Patel

गांधीनगर, १२ सप्टेंबर | भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. यासंदर्भात पक्षाकडून औपचारिक घोषणा केली जाणार आहे. गुजरात भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज गांधीनगरमध्ये झाले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने भूपेंद्र पटेल नेतेपदी निवडले गेले.

गुजरातमध्ये भाजपची नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. राजधानी गांधीनगरला भाजपाचे आमदार जमा झालेत. भाजपचे पर्यवेक्षक तोमर, प्रल्हाद जोशी हेही ह्या बैठकीत आहेत. ज्यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव चर्चेत आहे ते मनसुख मांडवीय, नितीन पटेलही यांनीही बैठकीला हजेरी लावलीय. गुजरातचा नवा मुख्यमंत्री कोण याची देशभरात उत्सुकता आहे. अशातच ट्विटरवर #Nitin असं ट्रेंड होतंय. हा ट्रेंड आहे उपमुख्यमंत्री राहीलेल्या नितीन पटेल यांच्याबद्दल. कारण एका अर्थानं त्यांनी स्वत:चीच दावेदारी जगजाहीर करुन टाकलीय.

गुजरातमध्ये नवे मुख्यमंत्री निवडीपूर्वीच नितीन पटेलांची बंडाची भाषा?, भाजपमध्ये धाकधूक वाढली – Gujarat deputy CM Nitin Patel used rebellion language before selection of New Chief Minister of Gujarat :

गुजरातचा मुख्यमंत्री बदलतो पण उपमुख्यमंत्री मात्र तसाच राहातो. आनंदीबेन पटेल यांना हटवून जेव्हा रुपाणींना मुख्यमंत्री केलं त्यावेळेसही नितीन पटेल हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. तेच मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती पण झाले रुपाणी. त्यावर नितीन पटेलांनी त्यावेळेस नाराजी व्यक्त केली होती. बऱ्याच काळापर्यंत त्यांनी उपमुख्यमंत्री होऊनही कार्यभार स्वीकारलेला नव्हता. शेवटी भाजप हायकमांडनं निर्वाणीचा इशारा दिला त्यावेळेस नितीन पटेल लाईनीत आले. आताही नितीन पटेल यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव चर्चेत आहे. पण त्यांना केलं जाणार का याबद्दल त्यांनाही विश्वास नसावा. त्यामुळेच ऐन नेता निवडीच्या तोंडावर त्यांनी गुजरातचा मुख्यमंत्री कसा असावा तेच जाहीर करुन टाकलं. नितीन पटेल म्हणाले- गुजरातचा नवा मुख्यमंत्री हा अनुभवी, लोकप्रिय आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा तसच सर्वांना मान्य असलेलाही असावा.

BJP MLA Bhupendra Patel elected as the new leader of BJP Legislative Party :

नितीन पटेल हे पाटीदार समाजातूनच येतात. त्या समाजाची नाराजी वाढल्यामुळेच रुपाणींना हटवून नव्या मुख्यमंत्र्याचा शोध घेतला जातोय. नितीन पटेल हे कायम मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून चर्चेत असतात. ते अनुभवी आहेत, त्यांना पाटीदार समाजाच्या पाठिंब्याचाही ते दावा करतात. सोशल मीडियावर त्यांचे काही चाहते, कार्यकर्ते सक्रिय झालेत. त्यांनीही नितीन पटेलांचं नाव पुढं केल्याचं दिसतंय. भाजपा हायकमांड मांडवीय किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यापैकी कुण्या नव्या नेत्याला गुजरातचा मुख्यमंत्री करण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा आहे. भाजपचे निर्णय तसे सरप्राईजिंग असतात. कर्नाटकात ते अनुभवायला आलेलं आहेच. तेच गुजरातमध्येही होऊ शकतं. आपल्याला डावललं जाण्याची भीती नितीन पटेलांना पुन्हा असावी, त्यामुळेच त्यांनी नवा मुख्यमंत्री सर्वांना मान्य असणारा असावा असं म्हटल्याचं जाणकारांना वाटतं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Gujarat deputy CM Nitin Patel used rebellion language before selection of New Chief Minister of Gujarat.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या