28 April 2024 3:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा
x

Marathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी

Marathi Actress Anagha Bhagare

मुंबई, १२ सप्टेंबर | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेचे कथानक अतिशय रंजकदार वळणावर येऊन पोहचले आहे. मालिकेतील दीपाची बहीण श्वेता हि व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजेच अनघा भगरे हिच्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Marathi Actress Anagha Bhagare Biography, अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी – Marathi Actress Anagha Bhagare information in Marathi :

झी मराठवरील राम राम महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिसणारे प्रसिद्ध ज्योतिष अतुल भगरे हे अनघाचे वडील आहेत. अनघाचा जन्म २४ जुन १९९४ रोजी नाशिकमध्ये झाला. तिचे शालेय शिक्षण CEO मेरि हायस्कूल मधून पूर्ण झाले असून तिचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील SNDT कॉलेज मधून पूर्ण झाले आहे. तिने Mass Communication मध्ये पदवी प्राप्त केली आहे. अनघाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. काॅलेज मध्ये असताना छोट्या मोठ्या एकांकिकामध्ये ती सहभागी व्हायची. अनघाचे अजून लग्न झालेले नसून ती सिंगलच आहे.

झी मराठीवरील दिल दोस्ती दोबारा या मालिकेत तिने काम केले होते. अनघाने अनन्या या नाटकात सहायक अभिनेत्री म्हणून काम केले आहे. तिने ‘अनन्या’ या नाटकामध्ये अनन्याची मैत्रीण प्रियांका हे व्यक्तिरेखा अत्यंत उत्तम रीतीने साकारली होती. अनघाने अभिनय क्षेत्रात काम करण्याआधी बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनघाने महेश कोठारे यांच्या कोठारे विजन मध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम केले आहे. तिने व्हाट्सअप लग्न, कुलकर्णी vs कुलकर्णी या चित्रपटांमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.

आत्ता ती रंग माझा वेगळा या मालिकेत दीपाची बहीण श्वेताची महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या मालिकेत श्वेता हे पात्र Negative दाखवण्यात आले आहे. श्वेता नेहमी दीपाला त्रास देण्याचे काम करत असते. फार कमी लोकांना महित आहे की अनघा ही भगरे गुरुजींची कन्या आहे. अनघा अतुल भगरे ही भगरे गुरुजींची लेक आहे. अनघाची आई मोहिनी भगरे या शिक्षिका आहेत. ‘रंग माझा वेगळा’ ही अनघा ची पहिलीच मालिका असुन , ‘अनन्या’ या गाजलेल्या नाटकातही काम केले आहे. अनघाने एसएनडिटी कॉलेज मुंबईतुन मास कम्युनिकेशनची पदवी मिळवली. टिने काही काळासाठी ‘कोठारे व्हिजन’ मध्ये पीआर ब्रॅंड मॅनेजर पदाचा भारही सांभाळला होता.

Marathi Actress Anagha Bhagare Biography :

Anagha Bhagare is an actress in Marathi Film Industry. She is known for playing an antagonist in a Marathi serial “Rang Maza Vegla” where she essays a character named Shweta Devkule, beautiful young sister of the leading lady. She is also known for playing character “Priyanka” in a known Marathi Play named “Ananya”.

Anagha Bhagare on Social Media:
Instagram: https://www.instagram.com/anaghaa_atul/?hl=en

Tags: Anagha Bhagare Biography, Anagha Bhagare Wiki, Anagha Bhagare Birthday, Anagha Bhagare Age, Anagha Bhagare Husband, Anaghaa Bhagare, Anagha Bhagare Qualification

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Biography: Marathi Actress Anagha Bhagare information in Marathi.

हॅशटॅग्स

#AnaghaBhagare(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x