3 May 2024 11:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

RBI Alert | सावधान! या 4 बँकांपैकी कोणत्याही बँकेत तुमचं खातं आहे का? | आरबीआयने घातले निर्बंध

RBI Alert

RBI Alert | रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ग्राहकांच्या हितासाठी चार सहकारी बँकांवर मोठी कारवाई केली आहे. या चार सहकारी बँकांची बिघडलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन आरबीआयने अनेक निर्बंध घातले आहेत. रामगढिया सहकारी बँक ऑफ दिल्ली, साहेबराव देशमुख सहकारी बँक ऑफ मुंबई व सांगली सहकारी बँक, शारदा महिला सहकारी बँक ऑफ कर्नाटक या चार बँका आहेत.

* साहेबराव देशमुख सहकारी बँक ऑफ मुंबई (महाराष्ट्र)
* सांगली सहकारी बँक (महाराष्ट्र)
* शारदा महिला सहकारी बँक ऑफ कर्नाटक (कर्नाटक)
* रामगढिया सहकारी बँक ऑफ दिल्ली (दिल्ली)

सहा महिन्यांची बंदी :
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार बँकांवर एकूण सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली असून, ती ८ जुलै २०२२ पासून लागू आहे. बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 अंतर्गत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

काय आहे बंदी :
आरबीआयने यासंदर्भात नोटीस जारी केली आणि म्हटले की आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय या चार बँका कोणतेही कर्ज देऊ शकत नाहीत किंवा त्यांचे नूतनीकरण करू शकत नाहीत. आरबीआयच्या निर्देशान्वये या चार सहकारी बँकांच्या ठेवीदारांकडून पैसे काढण्यावरही मर्यादा घालण्यात आली आहे.

किती मर्यादा :
आरबीआयच्या मते रामगढिया सहकारी बँक आणि साहेबराव देशमुख सहकारी बँक यांच्या बाबतीत प्रत्येक ठेवीदारामागे ५० हजार रुपयांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्याचबरोबर सांगली सहकारी बँकेच्या बाबतीत ही मर्यादा ४५ हजार रुपये प्रति ठेवीची आहे. शारदा महिला सहकारी बँकेच्या बाबतीत ठेवीदाराला जास्तीत जास्त सात हजार रुपये काढता येतात.

बँकिंग परवाने रद्द करणे समजू नये :
या निर्देशांना बँकिंग परवाने रद्द करणे समजू नये, असेही आरबीआयने स्पष्ट केले. आरबीआयने सांगितले की, परिस्थितीनुसार निर्देशांमध्ये सुधारणा करण्याचा विचार केला जाऊ शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: RBI Alert imposes restrictions withdrawal caps on 4 banks will impact customer check details 09 July 2022.

हॅशटॅग्स

#RBI Alert(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x