3 May 2024 7:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Saving Tips | तुम्ही पैशांची बचत कशी करावी?, पैशाचा योग्य वापर कसा करावा यासाठी हा गोष्टी लक्षात ठेऊन संपत्ती वाढवा

saving tips

Saving Tips | आजच्या महागाईच्या काळात उत्पन्न कमी असताना बचत करणे अवघड जाते. तरी आपण साधे जीवन आणि साधे राहणीमान ठेवून, कमी पैसे खर्चून चांगली बचत करू शकतो. आपली जीवनातील उपभोगाची आवश्यकता समजून घ्या आणि उधळपट्टी थांबवा. अनावश्यक वस्तूंवर खर्च टाळा.

पैसा बचत करणे म्हणजे पैसे कमावल्यासारखेच आहे. बचतीचे महत्त्व समजून घेतली की आपल्याला पैसे बचतीची सवय जीवनात लागेल. कारण तुम्ही आज जर बचत केली भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा गरजेच्या वेळी खूप उपयोगी येते. पैसा बचत करण्याचे मार्ग काय आहेत आणि, यासाठी आपण काय करू शकतो याची माहिती घेऊया.

क्रेडिट कार्डचा योग्य वापर :
जर तुम्हाला पैसे बचत करायचे असतील तर क्रेडिट कार्डचा अनावश्यक वापर करणे तुम्हाला टाळावे लागेल. क्रेडिट कार्डने जेवढी जास्त खरेदी होते, त्यावर आकारले जाणारे व्याजही जास्त असते. त्यामुळे क्रेडिट कार्डवर होणार खर्च नियंत्रणात आणला तर तुम्ही चांगली बचत करू शकता.

बचतीचे प्रमाण ठरवा :
तुमच्या उत्पन्नानुसार बचतीचे प्रमाण ठेवा. ठराविक रक्कमच वाचवा. दरम्यान, तुम्ही ठरवलेल्या बचतीच्या प्रमाण पेक्षा जास्त खर्च करू नका. जेणेकरुन तुम्हाला गरजेनुसार बचत करता येईल आणि ते पैसे भविष्यातील नियोजनात उपयोगी येईल. बचत करण्यासाठी, एकाच वेळी भरपूर मोठी रक्कम बचत करण्याऐवजी लहान बचतीतून सुरुवात करावी. ही छोटी बचत पुढे मोठ्या बचतीच्या रूपात येईल.

साधे जीवन जगूनही आपण चांगली बचत करू शकतो. पैशांची उधळपट्टी करू नका. अनावश्यक वस्तूंवर खर्च टाळा. गरज नसतानाही तिथे फक्त दिखाव्यासाठी खर्च करु नका. जर तुम्हाला बचत करायची असेल तर तुमचे ध्येय आणि योजना योग्य असले पाहिजे, तर नक्कीच तुम्ही चांगली बचत करू शकाल. तसेच चांगल्या बचतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चांगले नियोजन आणि कठोर परिश्रम, काही वेळा तडजोड करणे ही आवश्यक आहेत.

उत्पन्नाचे स्त्रोत वाढवा :
तुम्हाला उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त निर्माण करावे लागतील. एका उत्पन्न स्त्रोतावर अवलंबून राहून बचत करणे अवघड होईल. जर उत्पन्नाचे स्त्रोत अनेक असतील तर बचतही ही वाढेल. अतिरिक्त उत्पन्नाचे स्त्रोत काहीही असू शकते जसे की घरभाडे, शेअर बाजार गुंतवणूक किंवा इतर कोणत्याही लघु व्यवसायातून मिळालेला नफा हे असू शकते.

नियमित बचत :
चांगल्या बचतीसाठी, तुमची बचत नियमित असणे महत्त्वाचे आहे. हे करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे ठराविक वेळी तुमच्या खात्यातून ती रक्कम वजा करून बचत करणे. उत्पन्नानुसार बजेट बनवा आणि प्रत्येक वस्तूंवर गरजेपुरताच खर्च करा. तुमची बिले, बचत किंवा इतर खर्च आपोआप वजा होतील अशी व्यवस्था करा.

आवश्यकता कि इच्छा?
आपल्या गरजेनुसारच पैसे खर्च करा नाहीतर तुमचे बचतीचे उदिष्ट पूर्ण होणार नाही. गरज आणि इच्छा यातील फरक समजून घेऊन पैशाचा योग्य वापर करा. तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची आहे, पण त्या वस्तूची गरज आहे का? याचा विचार खरेदीआधी केला पाहिजे आणि पैसे खर्च केली पाहिजे. तरच तुम्ही चांगली बचत करू शकता आणि त्याचा वापर भविष्यात गुंतवणुकीसाठी किंवा गरजेच्या वेळी करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Saving Tips and benefit of spending money when required in 25 July 2022.

हॅशटॅग्स

#Investment(85)saving tips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x