27 April 2024 6:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Mutual Fund SIP | दररोज फक्त 150 गुंतवा आणि 1 कोटी 7 लाख रुपये परतावा मिळवा, ही आहे आयुष्य बदलणारी गुंतवणूक

mutual fund SIP

Mutual Fund SIP | जेव्हा आपण 15 ते 20 वर्षासाठी गुंतवणूक करतो, त्याची मुदत पूर्ण होताना परतावा दर सर्वात जास्त असतो. ह्याचा मिळणारा परतावा देखील खूप मोठा असू शकतो.

करोडपती होण्याची युक्ती :
आजच्या जगात तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल तर त्यासाठी ही पैसा हा लागतोच. पैशातूनच पैसा बनवला जातो. अनेकदा श्रीमंत लोक हे सूत्र आजमावताना दिसतात. पण, कोणीही एका दिवसात श्रीमंत होत नाही. यासाठी गुंतवणुकीसोबत योग्य नियोजन आणि बचती आणि संयमची गरज आहे. अशीच एक छोटी गुंतवणूक तुम्हाला करोडपती बनवू शकते.

दीर्घकाळासाठी गुंतवणूक :
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP तुमच्यासाठी गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग असू शकतो. तज्ञांचे असे मत आहे की जर एखाद्या गुंतवणूकदाराला एसआयपीद्वारे उच्च परतावा मिळवायचा असेल तर त्यांनी दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे. एसआयपी गुंतवणुकीत चक्रवाढ व्याज लाभ घेण्यासाठी 15 ते 20 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

चक्रवाढ व्याज परतावा लाभ :
म्युचुअल फंड तज्ञ नेहमी एसआयपीमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 15 ते 20 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर मुदतपूर्तीच्या वेळी चक्रवाढ व्याज परताव्यामुळे मिळणारी रक्कम वाढण्याचा दर जास्त असतो आणि यामुळे त्यांना मोठा परतावा मिळू शकतो.

दीर्घ मुदतीत मोठा परतावा :
तज्ज्ञांच्या मते, 20 वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास सरासरी वार्षिक 15 टक्के परतावा मिळू शकतो. तसेच, हे गुंतवणूकदाराने निवडलेल्या SIP पॉलिसीच्या प्रकारावर अवलंबून असते. योग्य वेळी योग्य SIP निवडल्यास 15 टक्के वार्षिक परतावा सहज मिळू शकतो.

करोडो रुपये परतावा कसा मिळतो?
समजा तुम्ही दर महिन्याला एसआयपीमध्ये 4,500 रुपये गुंतवले आणि त्यावर 15% वार्षिक परतावा अपेक्षित आहे. तुम्ही ही गुंतवणूक 20 वर्षांपासून केली आहे. SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने त्यावर मिळणाऱ्या एकूण रिटर्नबद्दल जाणून घेतले तर 20 वर्षांच्या शेवटी तुम्ही 68,21,797 रुपयांचे मालक होऊ शकता. तथापि, येथे अश्याच युक्तीच्या मदतीने, तुम्ही 1 कोटी रुपये परतावा मिळवू शकता.

1 कोटी परतावा कसा मिळेल?
या SIP मध्ये एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही दर महिन्याला 500 रुपयेचा टॉप-अप वाढवला तर तुम्ही सहज करोडपती होऊ शकता. तुम्ही ही युक्ती वापरल्यास, प्रत्येक महिन्याला 4,500 रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक तुम्हाला 20 वर्षांनंतर मुदत पूर्ण झाल्यावर 1,07,26921 रुपये परतावा मिळवून देऊ शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual Fund SIP return for long term investment on 2 August 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(220)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x