27 April 2024 11:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

SBI Vs Post Office | मासिक उत्पन्न योजनेत सर्वात जास्त परतावा कुठे, एसबीआय किंवा पोस्ट ऑफिस पैकी सर्वोत्तम पर्याय कोणता?

SBI vs Post office

SBI Vs Post Office | कोणत्याही ठेवीदारासाठी मासिक उत्पन्न योजना हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये, गुंतवणूकदाराला कोणत्याही जोखीम शिवाय गुंतवणुकीची मुदतपूर्ती होईपर्यंत दर महिन्याला नियमित ठराविक परतावा मिळत राहतो.

कोणत्याही ठेवीदारासाठी मासिक उत्पन्न योजना गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि जोखीम विरहित असा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये, वृद्ध लोकांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध आहे ज्यामध्ये ते त्यांची वैयक्तिक गुंतवणूक वाढवू शकतात. वृद्धांसाठी हे एक उत्पन्नाचे दुसरे स्रोत बनू शकते. SBI आणि पोस्ट ऑफिस दोन्ही संस्था त्यांच्या ग्राहकांना मासिक उत्पन्न योजनेची सेवा प्रदान करत आहेत. आज आम्ही तुम्हाला ह्या योजनेची माहिती देऊ की कोणाची योजना चांगली आहे आणि कोण जास्त व्याज परतावा देत आहे.

SBI मासिक उत्पन्न ठेव योजना :
ही एक मासिक उत्पन्न योजना आहे ज्यामध्ये ठेवीदार दे महिन्याला काही पैसे जमा करतात आणि त्यांना प्रत्येक महिन्याच्या शेवटी त्यांना मूळ जमा रकमेसह काही व्याज परतावा मिळते. एसबीआयच्या मासिक ठेव योजनेची मुदत पूर्ती वेळ मर्यादा फक्त 36, 60, 84 आणि 120 महिने आहे. SBI ने 14 जून 2022 रोजी आपल्या मुदत ठेव आणि मासिक ठेव योजनेत बदल केले आहे. या बदलानंतर बँक आता सर्वसामान्यांसाठी 5.45 टक्क्यांवरून 5.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.95 टक्के ते 6.30 टक्के वार्षिक व्याज जाहीर केले आहे. एसबीआयने जाहीर केले की, त्यांच्या गुंतवणूकदारांना गुंतवणुक सुरू केल्यानंतर बरोबर 1 वर्षानंतर पूर्ण परतावा दिला जाईल.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न ठेव योजना :
या योजनेअंतर्गत, कोणताही प्रौढ व्यक्ती पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत खाते उघडू शकतो. यासोबतच तो आणखी तीन प्रौढ व्यक्तींसोबत संयुक्त खातेही उघडू शकतो. हे खाते उघडण्यासाठी त्याला मासिक किमान 1000 रुपये जमा करावे लागतील. यामध्ये, एका खात्यासाठी कमाल गुंतवणुकीची वार्षिक मर्यादा 4.5 लाख रुपये आहे आणि संयुक्त खात्यातील गुंतवणुकीची वार्षिक कमाल मर्यादा 9 लाखांपर्यंत आहे. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेंतर्गत, गुंतवणूकदारांना 5 वर्षांपर्यंतच्या मुदत पूर्ती कालावधीनंतर 6.6 टक्के वार्षिक व्याज परतावा मिळेल. जर खातेदाराचा 5 वर्षांपर्यंतच्या मुदतपूर्तीपूर्वी मृत्यू झाला, तर सर्व पैसे त्याच्या कायदेशीर नामनिर्देशित वारसाकडे जातील.

SBI आणि पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना पाहता, हे स्पष्टपणे म्हणता येईल की पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना SBI च्या मासिक उत्पन्न योजनेच्या तुलनेत समान लाभ पण त्यावर अधिक व्याज परतावा देत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Vs Post Office Monthly income schemes investment returns on 4 August 2022.

हॅशटॅग्स

SBI vs Post office(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x