2 May 2024 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार?
x

Motilal Oswal Mutual Fund | ही आहे 4 स्टार रेटेड मजबूत मल्टिबॅगर म्युचुअल फंड योजना, अनेकजण पैसा वेगाने वाढवत आहेत

Motilal Oswal Mutual Fund

Motilal Oswal Mutual Fund | जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड योजनांच्या पोर्टफोलिओचे निरीक्षण केले, तर तुम्हाला असे समजेल की ज्या योजनांमध्ये मिड-कॅप इक्विटी स्टॉकमध्ये वाढ झाली होती, त्यांनी दीर्घ मुदतीत जबरदस्त कामगिरी केली आहे. जेव्हा इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमध्ये मिडकॅप इक्विटी शेअर्सबद्दल चर्चा केली जाते, तेव्हा 101 आणि 250 च्या दरम्यान बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांचा संदर्भ जाणीवपूर्वक विचारात घ्यायचा असतो. या विभागातील फंड व्यवस्थापकांना त्यांच्या योग्य स्टॉक निवडीचा आणि गुंतवणुकीचा जबरदस्त फायदा झाला आहे. या लेखात, आज आम्ही तुम्हाला मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाविषयी काही माहिती देऊ. हा मिड-कॅप म्युच्युअल फंड आहे. या फंडाने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे.

मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड :
मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड हा मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाअंतर्गत तयार केलेला एक मिडकॅप म्युचुअल फंड आहे. 12 फेब्रुवारी 2014 रोजी हा फंड लाँच करण्यात आला होता. हा फंड फक्त 8 वर्ष जुना मिडकॅप इक्विटी म्युच्युअल फंड आहे. मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाची मालमत्ता अंडर मॅनेजमेंट – डायरेक्ट प्लॅन 2919.32 कोटी रुपये नोंदवली आहे. फंडाचा एकूण खर्च गुणोत्तर 0.96, टक्के असून तो या श्रेणीतील इतर फंडांच्या तुलनेत त्याचे सरासरी खर्च गुणोत्तर 0.9 टक्के आहे.

4 स्टार रेटिंग व्हॅल्यू रिसर्च आणि म्युचुअल फंड रेटिंग एजन्सी CRISIL या दोघांनी मिळून या म्युचुअल फंडाला 4 स्टार रेटिंग जाहीर केली आहे. या फंडाने मागील काही वर्षांमध्ये त्याच्या बेंचमार्कला मागे टाकले असून काही वर्षांत त्याच्या समकक्ष फंडाना मागे टाकले आहे. या म्युचुअल फंडाने SIP गुंतवणुकीमध्येही खूप चांगली कामगिरी केली आहे.

किमान गुंतवणूक मर्यादा :
या म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी किमान एकरकमी गुंतवणुक मर्यादा 500 रुपये आहे. आणि SIP गुंतवणुकीसाठी किमान 500 रुपये गुंतवणूक आवश्यक आहेत. या छोट्या रकमेतून तुम्ही तुमचा म्युचुअल फंड मध्ये गुंतवणुकीचा प्रवास सुरू करू शकता. तर, अतिरिक्त गुंतवणुकीसाठी, किमान आवश्यक रक्कम 500 रुपये आहे. गुंतवणुकीच्या 15 दिवसांच्या आत जर फंड रिडीम केले तर फंड कंपनी तर्फे 1 टक्के दंड शुल्क लावला जाईल. या फंडमध्ये कोणताही लॉक-इन कालावधी लागू नाही.

दीर्घकालीन परतावा :
या म्युचुअल फंडाने आपल्या स्थापनेपासूनच आपल्या गुंतवणूकदारांना 21.96 टक्के वार्षिक सरासरी परतावा दिला आहे. तर त्याचे 1-वर्ष, 2-वर्ष, 3-वर्ष आणि 5-वर्षांचे वार्षिक परतावे अनुक्रमे 28.39 टक्के, 44.90 टक्के, 28.58 टक्के, आणि 16.27 टक्के असे आहेत. त्याच कालावधीसाठी एसआयपी वार्षिक परतावा 23.61 टक्के, 36.03 टक्के, 34.79 टक्के आणि 23.58 टक्के आहे.

फंडाच्या पोर्टफोलिओ बद्दल सविस्तर :
हा म्युचुअल फंड एक इक्विटी मिडकॅप फंड असून ज्याची इक्विटी गुंतवणूक सुमारे 91.47 टक्के आहे. लार्ज-कॅप इक्विटीमध्ये त्याचे 4.07 टक्के एक्सपोजर आहे. यानंतर मिड-कॅप्समध्ये 21.93 टक्के आणि स्मॉल-कॅप समभागांमध्ये 34.79 टक्के गुंतवणूक आहे. फंडाची सर्वात मोठी गुंतवणूक आर्थिक आणि वित्तीय देय क्षेत्रात आहे. त्यापाठोपाठ ग्राहक वस्तू, ऑटोमोबाईल, बांधकाम, भांडवली वस्तू, ऊर्जा, सेवा, रसायने, साहित्य, आरोग्यसेवा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात जास्त गुंतवणूक आहे. फंडाच्या टॉप 10 इक्विटी होल्डिंग्समध्ये ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया, फिनिक्स मिल्स, सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स, गुजरात गॅस, कॅम्पस ऍक्टिव्हवेअर, व्होल्टास, एयू स्मॉल फायनान्स बँक, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्स कंपनी, बजाज फायनान्स आणि बार्बेक्यू-नेशन हॉस्पिटॅलिटी अश्या मोठ्या दिग्गज शेअर्स चा समावेश आहे.

हा म्युच्युअल फंड आपल्याला योग्य पणे गुंतवणूक केल्यासक रोडपती बनवू शकतो. म्युच्युअल फंडांमध्ये 15X15X15 हे गुंतवणूक सूत्र वापरले जाते. या सूत्रात ’15’ तीन वेळा आहे. यामध्ये 15 टक्के वाढीचा दर, 15 वर्ष कार्यकाळ आणि 15 हजार बचतीची मासिक रक्कम अशी विभागणी आहे. 15 वर्षांमध्ये (180 महिन्यांत) तुम्हाला 15 टक्के वार्षिक परतावा मिळेल असे गृहीत धरून तुम्हाला 1 कोटी रुपयांच्या निधीवर पोहोचण्यासाठी दरमहा 15000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच, 15 वर्षे, दरमहा 15000 आणि वार्षिक 15 टक्के परतावा ह्या हिशोबाने तुम्ही म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करून करोडपती होऊ शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Motilal Oswal Mutual Fund investment returns for long term on 16 August 2022.

हॅशटॅग्स

Motilal Oswal Mutual Fund(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x