2 May 2024 1:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार?
x

Multibagger Stocks | या शेअरवर 1 महिन्यात 75 टक्के परतावा, वेगाने वाढतोय पैसा, नव्या गुंतवणूकदारांना कमाईची संधी

Multibagger Stock

Multibagger Stocks | मल्टीबॅगर धमाकेदार स्टॉक युग डेकोर लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस देण्याचे जाहीर केले आहे. 16 ऑगस्ट रोजी झालेल्या संचालकाच्या बैठकीत गुंतवणूकदारांना बोनस जाहीर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

मल्टीबॅगर स्टॉक युग डेकोर लिमिटेड :
शेअर बाजारात एखादी कंपनी जबरदस्त परतावा देऊन बोनसही जाहीर केला तर गुंतवणूकदारांच्या उत्साहाला कोणती मर्यादा राहत नाही. मल्टीबॅगर स्टॉक युग डेकोर लिमिटेडने आपल्या भागधारकांना बोनस वितरीत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 16 ऑगस्ट रोजी झालेल्या संचालकांच्या बैठकीत भागधारकांना बोनस जाहीर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. चला तर मग ह्या स्टॉकची कामगिरी कशी आहे, आपण जाणून घेऊ.

एका महिन्यात 75 टक्के परतावा :
युग डेकोर लिमिटेड हा अशा काही शेअर्सपैकी एक आहे, ज्यांनी या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आणि बोनस ही जाहीर केले आहे. मागील एका महिन्यात या कंपनीने आपल्या भागधारकांना तब्बल 75 टक्के परतावा मिळवून दिला आहे. दरम्यान हा शेअर 32.50 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 57 रुपये प्रति शेअरवर ट्रेड करत आहे. मागील 6 महिन्यांत बीएसईमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 90.टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी, जर आपण कंपनीची 2022 या वर्षीची आतापर्यंतची कामगिरी पहिली तर, युग डेकोर कंपनीने या कालावधीत आपल्या भागधारकांना तब्बल 120 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 3 जानेवारी 2022 ते 16 ऑगस्ट या कालावधीत कंपनीची शेअर ट्रेडिंग किंमत 25.90 रुपयेवरून 57 रुपये वर जाऊन पोहोचली आहे.

बोनस जाहीर आणि वितरण :
सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने असे नमूद केले आहे की, ‘पात्र गुंतवणूकदारांना 2:1 शेअर बोनस म्हणून वितरीत केले जाईल. कंपनीकडून रेकॉर्ड तारीखही लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती सेबीला देण्यात आली आहे. या कंपनीचा 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 63.55 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 22 रुपये प्रति शेअर होती. युग डेकोर कंपनी ग्लु (गम) बनवण्याचा व्यवसाय करते. मागील आर्थिक वर्षात या कंपनीच्या महसूलात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. या कंपनीची सुरुवात गुजरातमध्ये 2003 साली झाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Yug Decore share price return on 18 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x