14 May 2024 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | लॉटरी लागणार! हा IPO शेअर पहिल्याच दिवशी 100 टक्केपेक्षा जास्त परतावा देणार, GMP संकेत Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक येणार तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस प्राईस Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉकला या प्राईसवर पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा अलर्ट EPFO Online Claim | पगारदारांसाठी अलर्ट! तुमचा नंबर सुद्धा त्यात नाही ना? पुढे क्लेम सेटलमेंट कशी असेल? Mobile Recharge Hike | बापरे! कोट्यवधी मोबाइल युजर्सना झटका लागणार! मोबाईल रिचार्ज खर्च 25% वाढणार Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, या 5 राशींसाठी पुढचे 17 दिवस अत्यंत लाभदायक, तुमची राशी कोणती? Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय
x

Multibagger Stocks | या शेअरनी 400 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, पुढील टार्गेट प्राईस देऊ शकते अजून परतावा, ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला

Multibagger Stocks

Multibagger Stocks| Divi’s Laboratories ने मागील 5 वर्षात शेअर बाजारातील आपल्या भागधारकांना तब्बल 400 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीच्या एका शेअरची किंमत 700 रुपये होती, ती आता वाढून 3497 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम. बऱ्याच वेळा असे दिसून आले आहे की शेअर्सनी दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. असाच एक स्टॉक आहे म्हणजे डेव्हिस लॅब. या कंपनीने मागील 5 वर्षात शेअर बाजारातील आपल्या भागधारकांना तब्बल 400 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवून दिला आहे. या कालावधीत डेव्हिस लॅब च्या एका शेअरची किंमत 700 रुपयांवर होती ती आता वाढून 3497 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पुढील काळात हा शेअर आपल्या भागधारकांना जबरदस्त परतावा मिळवून देईल, असा विश्वास तज्ञांना आहे.

ब्रोकरेज फर्म स्टॉकबद्दल अतिशय उत्साही :
ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधर यांनी जाहीर केले आहे की, “उत्पादनाच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीच्या उत्पन्नावर चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. कंपनी पुढील काळात आणखी चांगली कमाई करेल असा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. Custom synthesis करणारे बहुउद्देशीय सुविधा केंद्र देखील आता तयार आहे. ब्रोकरेज फर्म ने दिलेल्या माहितीत असे म्हंटले की हा फॉर्मा कंपनीचा स्टॉक पुढील काळात 4140 रुपयांपर्यंत वाढू शकतो. म्हणजेच सध्याच्या किमतीवरून आणखी 20 टक्के अधिक वाढ अपेक्षित आहे.

मागील पाच वर्षांत भागधारकांना 400 टक्के नफा देणाऱ्या या शेअरच्या किमती सध्या प्रचंड प्रमाणत घसरत आहेत. मागील वर्षभरात कंपनीच्या शेअरची किंमत 4856 रुपयांवरून 3496 रुपयांपर्यंत खाली आली आहे. म्हणजेच फक्त एका वर्षात NSE मध्ये हा शेअर 27.96 टक्क्यांनी घसरला आहे. दुसरीकडे, या वर्षाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीचे शेअर एके काळी 4651 रुपयांवर ट्रेड करत होते पण आता शेअर ची किंमत 3496 रुपयांपर्यंत खाली आली आहे. मागील 8 महिन्यांत ह्या फार्मा स्टॉकमध्ये 24 टक्क्यांपर्यंत पडझड झाली आहे.

६ महिन्यांपूर्वी या शेअरवर पैसे लावणाऱ्या भागधारकांना जबरदस्त नुकसान झाले आहे. या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअरची किंमत 4138 रुपयांवर खाली पडली आणि 3496 रुपयांवर येऊन पोहोचली आहे. म्हणजेच सध्या कंपनीचे शेअर 15 टक्क्यांपर्यंत खाली ट्रेड करत आहेत. मागील महिनाभरातही कंपनीच्या शेअर्समधील पडझड चालूच आहे. मागील एका महिन्यात कंपनीच्या शेअरची किंमत 7.31 टक्क्यांनी खाली आली आहे. कंपनीच्या शेअर ची 52 आठवड्यांवजी उच्चांक पातळी किंमत 5425 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 3365 रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Devis laboratory share price return on 25 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x