28 April 2024 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा
x

NRC वरून संपूर्ण आसाम भाजपविरोधात पेटण्याची शक्यता?

आसाम : आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक अर्थात NRC नोंदणी प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदवताना, कोणीही भारताला इस्लामिक देश करण्याचा प्रयत्न करु नये असे मत मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुदीप रंजन सेन यांनी याचिकेच्या सुनावणी दरम्यान व्यक्त केले आहे. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर धर्माच्या आधारे भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केले पाहिजे होते, परंतु भारताने धर्म निरपेक्ष भूमिका स्वीकारली, असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले.

अधिवास अर्थात वास्तव्याच्या दाखल्यासंदर्भात अमोन राणा या तरुणाने आसामच्या उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. तीच याचिका निकाली काढताना न्यायमूर्ती. सेन यांनी हिंदू राष्ट्रासंदर्भात संबंधित मत मांडले. तसेच NRC प्रक्रियेत विविध त्रुटी असल्याने अनेक परदेशी नागरिक भारतीय झाले आणि जे मूळचे भारतीय आहेत त्यांना मात्र सदर यादीत स्थानच मिळू शकले नाही आणि ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अनेक इस्लामिक देश म्हणजे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांमधील हिंदू, शीख, जैन, पारसी अशा बिगर मुस्लीम समाजाच्या लोकांचा बऱ्याचदा आणि जाणीवपूर्वक छळ केला जातो. अशा सामान्य लोकांना भारतात राहण्याची मुभा द्यावी आणि कोणत्याही सरकारी कागदपत्रांच्या पूतर्तेशिवाय त्यांना देशाचे नागरिकत्व बहाल करावे, त्यासंदर्भात संसदेतील खासदारांनी अधिकृतपणे कायदा करावा, असेही त्यांनी निकालात स्पष्ट केले आहे.

तसेच सुरुवातीच्या काळात म्हणजे फाळणीनंतर पाकिस्तानने इस्लामिक राष्ट्राची भूमिका घेतली. परंतु, भारताने हिंदू राष्ट्राऐवजी धर्मनिरपेक्ष राष्ट्राची भूमिका स्वीकारल्याचे न्यायाधीशांनी म्हटले आहे. सदर निकालाची एक प्रत पंतप्रधान, गृहमंत्री, कायदा मंत्री, मेघालयचे राज्यपाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनाही पाठवावी, असे लेखी निर्देश सुद्धा त्यांनी सरकारी वकिलांना दिले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकार आणि आसाम सरकार यावर काय निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या दौऱ्यावर येत असल्याने आसाममधील सर्वच विरोधी पक्ष एकवटले असून जागोजागी मोदींचे प्रतीकात्मक पुतळे जाळणे आणि काळे झेंडे दाखवण्याच्या योजना आखण्यात आल्या आहेत. त्यामुळे आसाममधील राजकीय वातावरण अत्यंत बिकट झाल्याचे वृत्त आहे. भाजप सरकारकडून सदर विषयावरून सर्वकाही एकतर्फी होताना दिसत असून, सत्ताधारी कोणालाही जुमानण्याच्या मानसिकतेत नसल्याने वातावरण प्रचंड तापले आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x